Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या सोलाना क्रिप्टोकरन्सीबद्दल सर्वकाही...

जाणून घ्या सोलाना क्रिप्टोकरन्सीबद्दल सर्वकाही...

सोलाना ब्लॉकचेनवर (solana Blockchain) चालणारी क्रिप्टोकरन्सी म्हणजे सोलाना (SOLUSD), ज्याचे टिकर चिन्ह एसओएल (SOL) आहे. 2021 मध्ये सोलानाचे बाजारमूल्य 12,000 टक्क्यांनी वाढले होते आणि त्यावेळच्या 66 अब्ज डॉलरपेक्षा जास्त बाजार भांडवलासह ती पाचवी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी ठरली होती.

सोलाना हे विकेंद्रित (decentralized), स्केलेबल अ‍ॅप्लिकेशन्स होस्ट करण्यासाठी डिझाईन केलेले ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. 2017 मध्ये स्थापित, सोलाना हा सध्या जिनेव्हा येथील सोलाना फाऊंडेशनद्वारे चालवला जाणारा एक मुक्त-स्रोत प्रकल्प आहे. त्याची स्थापना 2017 मध्ये करण्यात आली होती. तर सोलाना ब्लॉकचेन हे सॅन फ्रान्सिस्कोमधील सोलाना लॅब्समध्ये तयार करण्यात आले होते. सोलाना हे इथरियमसारख्या प्रतिस्पर्धी ब्लॉकचेनच्या तुलनेत व्यवहार करण्याच्या दृष्टीने खूपच वेगवान आहे.

सोलाना ब्लॉकचेनवर चालणारी क्रिप्टोकरन्सी म्हणजे सोलाना (SOLUSD), ज्याचे टिकर चिन्ह एसओएल (SOL) आहे. 2021 मध्ये सोलानाचे बाजारमूल्य 12,000 टक्क्यांनी वाढले होते आणि त्यावेळच्या 66 अब्ज डॉलरपेक्षा जास्त बाजार भांडवलासह ती पाचवी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी ठरली होती.

सोलानाची (Solana) महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • सोलाना हे विकेंद्रित (decentralized), स्केलेबल अ‍ॅप्लिकेशन्स होस्ट करण्यासाठी डिझाईन केलेले ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे.
  • सोलाना प्रति सेकंद अनेक व्यवहारांवर काम करते. तसेच इथरियमपेक्षा खूपच कमी शुल्क आकारते.
  • सोलानाची मूळ क्रिप्टोकरन्सी, ज्याचे टिकर SOL आहे; 2021 मध्ये ती पाचव्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी ठरली होती.
  • सोलाना एक प्रूफ-ऑफ-स्टेक (PoS) ब्लॉकचेन असून, ती प्रूफ ऑफ हिस्ट्री (PoH) नावाचे नवीन तंत्रज्ञान देखील वापरते.

सोलानाचा संस्थापक कोण आहे?

सोलानाची सुरुवात क्वालकॉम अभियंता अनातोली याकोव्हेंको याने केली होती. 2017 मध्ये, याकोव्हेंकोने एका प्रकल्पावर काम करत असताना सोलानाची निर्मिती केली होती. 2020 मध्ये सोलाना प्रोटोकॉल आणि SOL टोकन लोकांसाठी खुले करण्यात आले.

सध्या किती SOL टोकन वितरित आहेत?

सोलाना फाउंडेशनने जाहीर केल्यानुसार, एकूण 489 दशलक्ष SOL टोकन वितरित केले जाणार असून, त्यातील 260 दशलक्ष टोकन आधीच बाजारात दाखल झाले आहेत.

इतर ब्लॉकचेन्सपेक्षा सोलाना अधिक फायदेशीर का मानले जाते?

आजचे व्यवहार प्रति सेकंदाने अगदी जलदरीत्या पूर्ण होत आहेत. इतर ब्लॉकचेनपेक्षा सोलानाला अधिक पंसती देण्यामागे हेच कारण आहे की, याची गती अभूतपूर्व आहे आणि ही सोलाना नेटवर्कची सर्वांत जमेची बाजू आहे. सोलाना डिझायनर्सच्या मते, सोलाना ही प्रति सेकंदात इतर कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा अधिक पटीने आणि वेगाने काम करते.