Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीत 2 घरं मिळतात का? नियम काय सांगतो

Mhada Lottery 2023

Image Source : www.mhada.gov.in

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या घरांसाठी एकावेळी किती जण अर्ज करू शकतात? या लॉटरीत 2 घरं मिळतात का? या प्रश्नांची उत्तर आजच्या लेखातून जाणून घ्या.

Mhada Lottery 2023: तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करायचे असेल तर म्हाडाने त्यांची लॉटरी(Mhada Lottery 2023) सुरु केली आहे. रास्त घराचे दर आणि उत्तम गुणवत्ता यासाठी म्हाडाला ओळखले जाते. तुम्हीही म्हाडामध्ये घर घेण्याच्या विचारात असाल तर तुमचंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. म्हाडाने त्यांच्या लॉटरीमध्ये यंदा अनेक नियम बदलले आहेत. पूर्वी अर्ज करण्यासाठी 21 कागदपत्र सादर करावी लागत होती मात्र आता 7 कागदपत्रांमध्ये(Documents) घर मिळवता येत आहे. ती कागदपत्र रजिस्ट्रेशन(Registration) करताना जमा करावी लागणार असून त्याची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हाडाच्या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन आणि अर्ज करायला 5 जानेवारीपासून सुरुवात झाली असून शेवटची तारीख 5 फेब्रुवारी असणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा.

एकावेळी किती घरांसाठी अर्ज करू शकता?

तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी(Mhada Lottery 2023) अर्ज करत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या गटांसाठी अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या शहरांतील  घरांसाठी अर्ज करू शकता. याशिवाय तुमच्याकडे मुंबईत म्हाडाचं घर आधीच असेल तर तुम्ही नागपूर(Nagpur), पुणे(Pune) किंवा कोकण(Konkan) विभागासाठी सुद्धा अर्ज करण्यास पात्र ठरणार आहात.

कोणत्या परिस्थितीत दुसरं घर मिळत नाही

तुमच्याकडे आधीच म्हाडाचं घर असेल तर तुम्हाला दुसऱ्यांदा घराचा लाभ घेता येत नाही. याशिवाय नवरा-बायको(Husband & Wife) हे म्हाडाच्या घराचे सहमालक असतात. त्यामुळे नवऱ्याच्या नावावर घर असेल आणि बायकोने पुन्हा अर्ज केला तर तुम्हाला घर मिळू शकणार नाही. तुम्ही मुंबई आणि नागपूर दोन्ही ठिकाणी घरासाठी वेगवेगळा अर्ज केला असेल आणि दोन्ही ठिकाणी घर मिळालं तर ते घेता येऊ शकत. त्यासंदर्भात तुम्हाला कागदपत्रही सादर करावी लागतात. यंदा म्हाडाने पूर्णपणे संगणकीय तंत्रज्ञानाचा आधार घेऊन लॉटरी काढली आहे. याशिवाय तुम्ही म्हाडाच्या अॅपवरूनही(App) अर्ज करू शकणार आहात.