Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेतकऱ्यांना रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे का?

farmer tax

भारतात शेतीतून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न आहे. म्हणजे, शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत (ITR filing for farmers) शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.

भारतात शेतीतून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न आहे. म्हणजे, शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत (Income Tax Act) शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर (Tax) भरावा लागत नाही. पण कायद्यात शेतकऱ्यांवर लागू होणाऱ्या टॅक्सबाबत विस्तृतपणे माहिती देण्यात आली आहे. त्यात प्रत्यक्ष शेती आणि शेतीशी निगडित इतर व्यवसाय, तसेच ग्रामीण भागातील शेतजमीन आणि शहरी भागातील शेतजमीन याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 2 (1 ए) मध्ये कृषी उत्पन्न म्हणजे, शेत जमिनीतून मिळणारे भाडे/महसूल (ITR Filing for Agriculture Income), तसेच शेतजमिनीतून पिकांद्वारे मिळणारे उत्पन्न आणि शेत जमिनीवर उभारण्यात आलेल्या इमारतींमधून मिळणारे उत्पन्न हे शेतीतून मिळणारे उत्पन्न म्हणून मानले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर, ज्याचे फक्त आणि फक्त शेती हेच उत्पन्न आहे; तर ते टॅक्स फ्री आहे. पण एखाद्याची शेती आहे. त्याचबरोबर त्याचा व्यवसाय, नोकरी किंवा जोडधंदा असेल तर त्याला त्या एकत्रित उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार. 

फक्त शेती उत्पन्न असल्यावर रिटर्न भरणं गरजेचे आहे का? (Do farmers need to file income tax return)

ज्या व्यक्ती किंवा शेतकऱ्याचे शेती हे एकमेव उत्पन्न आहे. त्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं बंधनकारक नाही. पण इन्कम टॅक्स विभागाला आजकाल पॅनकार्डवरून सर्व आर्थिक माहिती मिळत असते. म्हणजे, बॅंकेतील मुदत ठेवी, त्यावरील व्याज, शेतजमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, शेतीच्या कामासाठी विकत घेतलेले गाळे आदी व्यवहारांची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडे असते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे. त्यांनी त्यांनी आयटीआर रिटर्न फाईल (ITR filing for Agriculture Income) करावे आणि त्याद्वारे या गोष्टींची माहिती संबंधित विभागाला द्यावी. जेणेकरून भविष्यातील चौकशी किंवा आर्थिक भुर्दंड टाळण्यास मदत होऊ शकेल. शेतीतून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न असल्याचा सरसकट अर्थ घेऊ नये. या गफलतीमुळे अनेक शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. हे टाळण्यासाठी आयटीआर रिटर्न भरणं  (ITR filling)हा एक चांगला उपाय ठरू शकतो.

शेतकऱ्यांनी रिटर्न फाईल करताना कोणता फॉर्म भरावा? (Form for ITR filing for farmer)

रिटर्न फाईल करताना वार्षिक उत्पन्न 5 हजार रूपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास ITR-1 फॉर्म भरणं अपेक्षित आहे. पण 5 हजारांपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर ITR-2 फॉर्म भरला पाहिजे.

इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 10 (1) मध्ये शेतकऱ्याच्या एकूण उत्पन्नातून कृषी उत्पन्न (Agricultural Income for Tax) वगळण्यात आले आहे. म्हणजे, शेतजमिनीतून उत्पन्न होणारे सर्व उत्पन्न कृषी उत्पन्न किंवा शेतीतील उत्पन्न म्हणून पात्र नाही. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्याला काही उत्पादनांवर टॅक्स भरावा लागतो.