• 03 Oct, 2022 23:48

ITR-1 फॉर्म म्हणजे काय? तो कोणी भरायचा असतो?

income tax ITR form 1

आयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-1 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.

इन्कम टॅक्स विभागाने करदात्यांना त्यांचा टॅक्स भरताना सहजता यावी. तसेच त्यात काही अडथळे येऊ नयेत यासाठी करदात्यांचे (Tax Payer) उत्पन्न आणि त्याचे स्त्रोत यावर आधारित विविध भाग पाडले आहेत. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला सहज आयटीआर रिटर्न (ITR Return) भरता येऊ शकते, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयटीआर रिटर्न भरणे आवश्यक आहे. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.

इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर आयटीआर भरताना करदात्याला नेमका कोणता फॉर्म भरायचा आहे; याची माहिती असणे गरजेचे आहे. रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध आहेत. त्यातील तुमच्यासाठी कोणता फॉर्म योग्य आहे. तो जाणून घेऊन त्यानुसार आयटीआर रिटर्न भरणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण आयटीआर रिटर्न म्हणजे काय? (What is ITR Return?) त्याचे नियम आणि प्रकार समजून घेतले होते. आता आपण ITR मधील ITR-1 या फॉर्मबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

ITR -1 फॉर्म कोणाला लागू होतो?

ITR -1 फॉर्म यालाच सहज फॉर्म (Sahaj Form) असेही म्हटले जाते. 50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी ITR-1 फॉर्म लागू होतो.
 

2022-23 साठी ITR-1 रिटर्न फाईल करण्यास कोण पात्र आहे?

ITR-1 हा साधारण 1 पानाचा बेसिक फॉर्म आहे. ज्या व्यक्तीला खाली नमूद केलेल्या स्त्रोतांमधून 50 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळते. त्याला ITR-1 हा फॉर्म लागू होतो.

 • पगार/पेन्शनद्वारे मिळणारे उत्पन्न
 • घराच्या मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न 
 • इतर स्त्रोतांद्वारे मिळणारे उत्पन्न (लॉटरी आणि घोड्यांच्या शर्यतीमधून मिळणारे उत्पन्न)
 • एकत्रित इन्कम टॅक्सच्या बाबतीत अल्पवयीन आणि जोडीदाराचा समावेश होऊ शकतो.
   

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे का?

होय, इन्कम टॅक्स विभागाने सर्व करदात्यांना (Tax Payee) आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही काही मिनिटांत आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करू शकता.
 

2022-23 या वर्षासाठी ITR-1 कोण दाखल करू शकत नाही?

 • ज्याचे उत्पन्न 50 लाखांपेक्षा अधिक आहे.
 • अशी व्यक्ती जी कंपनीची संचालक/डायरेक्टर आहे किंवा त्याने त्या आर्थिक वर्षात अनलिस्टेड इक्विटी शेअर्स घेतले असतील.
 • अनिवासी आणि रेसिडेंट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट (RNOR)
 • ज्यांना एकापेक्षा अधिक घरांच्या मालमत्तेपासून उत्पन्न मिळते
 • लॉटरी, घोड्यांची शर्यती आणि वैध जुगार यातून मिळणारे उत्पन्न
 • करपात्र भांडवली नफा (अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही)
 • शेतीतून 5 हजारापेक्षा जास्त उत्पन्न मिळत असल्यास
 • व्यवसाय आणि उद्योगधंदे
 • ज्या व्यक्तीची भारताबाहेर मालमत्ता आहे.
 • कलम 90/90A/91 अंतर्गत परदेशात कर भरणाऱ्या व्यक्ती किंवा दुहेरी कर सवलतीचा दावा करणाऱ्या व्यक्ती
   

who can fill ITR 1 form
 

2022-23 साठी ITR-1 फॉर्ममध्ये IT विभागाने केलेले महत्त्वपूर्ण बदल

 • पगार या तरतुदी अंतर्गत कलम 89A मध्ये सूचित केल्यानुसार कायद्यामध्ये अधिसूचित केलेल्या देशामध्ये सेवानिवृत्तीसाठी राखून ठेवलेले उत्पन्न दाखवू शकता आणि त्याचा करसवलतीसाठी क्लेम करू शकता.
 • पेन्शनधारकांना आता कामाचे स्वरूप (Nature of Employment) या अंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, पब्लिक सेक्टर आणि इतर यापैकी संबंधित घटकाचा समावेश करणे गरजेचे आहे.
 • कलम 89A अंतर्गत विहित केल्यानुसार, कायद्यामध्ये अधिसूचित केलेल्या देशामध्ये राखून ठेवलेल्या सेवानिवृत्तीच्या उत्पन्नावर लागू झालेल्या करासाठी सवलतीचा दावा करू शकता.
   

ITR-1 ऑनलाईन कसा भरायचा? How to file ITR Online?

इन्कम टॅक्स विभागाने आयटीआर रिटर्न ऑनलाईन (e filling of income tax return) भरण्यासाठी स्वतंत्र वेबपोर्टल स्थापन केले. या वेबपोर्टलवर लॉग-इन करून ऑनलाईन रिटर्नचा पर्याय निवडा. स्टार्ट न्यू फिलिंग करून वैयक्तिक यूझरवर क्लिक करून ITR-1 फॉर्म निवडा. त्यात संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर बँकेची आणि वैयक्तिक माहिती भरा.
 

ITR - 1 भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

• पॅन कार्ड
• बँक स्टेटमेंट
• बँका किंवा पोस्टातील बचतीची प्रमाणपत्रे
• कर-बचत गुंतवणुकीचे पुरावे
• फॉर्म 16 (नोकरदार व्यक्तींसाठी)
• पगाराची स्लिप
• टीडीएस प्रमाणपत्र
• फॉर्म 26 एएस