Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

First Investment Plan: आयुष्यातील पहिली गुंतवणूक करतांना 'या' गोष्टींचा करा विचार

Investment

First Investment Plan: कमाईला सुरुवात झाल्यानंतर आयुष्यातील पहिली गुंतवणूक कुठे आणि किती करावी? याबाबत अनेकजण कन्फ्युज असतात. काही वेळा चुकीचे निर्णय सुद्धा घेतले जातात. त्यापासून वाचण्यासाठी जाणून घ्या पहिल्या गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती.

First Investment Plan: वयाच्या 20 वर्षानंतर साधारण पैसे कमवायला सुरुवात होते. तेव्हा अनेकजण आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायचा विचार करतात. काहीजण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात मग्न असतात. इच्छा पूर्ण करण्यासाठी नियमित मिळणारा पगार साथ देतो, पण काही बाबी अशा असतात ज्यासाठी बचत आणि गुंतवणूक महत्वाची असते. 

आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर अनेक आर्थिक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो, मग त्यासाठी सोय आतापासून करून ठेवणे भाग असते. त्याचबरोबर काही गोष्टी फक्त एका पगारात करणे शक्य नसते. जसं स्वत:चं घर, लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण, परदेशगमन आणि आपली निवृत्ती यासाठी खूप जास्त पैसा लागतो. म्हणून आयुष्यातील  पहिली गुंतवणूक करतांना या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. 

गुंतवणूक ही आपल्या इन्कमनुसार केली पाहिजे. जेवढं जास्त इन्कम तेवढी जास्त गुंतवणूक तुम्ही करू शकता. गुंतवणूक फक्त एकदा करून होत नाही ती वारंवार करावी लागते. या गुंतवणुकीसाठी आपण काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

कमी परतावा महागाईवर मात करू शकत नाही

काही गुंतवणूक अशा असतात ज्यात जोखीम कमी असते पण त्याचबरोबर परतावा सुद्धा कमी असतो. जसे पीपीएफ किंवा एमपीएस. कमी परतावा महागाईवर मात करू शकत नाही. त्यामुळे काही वेळा तुम्हाला जास्त जोखीम घेऊन इक्विटी म्युचल फंड किंवा थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करावी लागेल. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी अनेक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या पुढीलप्रमाणे,  

कंपनीची हिस्ट्री चेक करा. त्या कंपनीचे कार्य काय? येणाऱ्या काळातील तिचा अजेंडा काय? या सर्व बाबी तुम्ही माहित करूनच त्यात गुंतवणूक करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या मुलभूत गरजा म्हणजेच अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या बाबतीत गुंतवणूक पर्याय सुद्धा तुम्ही गुंतवणुकीसाठी निवडू शकता. उदा.घर घ्यायचं असेल तर गृहकर्ज घेऊन स्वत:चं घर घेऊन त्या गृहकर्जाचे हफ्ते फेडणं हीसुद्धा एक गुंतवणूक होऊ शकते.

सोन्यात किती गुंतवणूक करू शकता? 

सोन्याचे दर नेहमी बदलत असतात. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करतांना ती कामपूरती करावी. जवळपास 10 ते 15 टक्के इतकीच गुंतवणूक सोन्यात करू शकता. बाकी सगळी गुंतवणूक पीपीएफ, एनपीएस, बॉन्ड्स, बॅंकेचे फिक्स डिपॉझिटमध्ये इमर्जन्सी फंड आणि याच्या व्यतिरिक्त म्युचुअल फंड किंवा शेअर्स या सर्व पर्यायांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(News Source: economictimes..com)