Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saving account new rules: बँक खात्याशी संबंधित नियमांमध्ये बदल, जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

Saving account new rules

Image Source : http://www.currentaffairs.adda247.com/

Saving account new rules: 2023 मध्ये झालेल्या बदलांमध्ये बँकेचे नियम सुद्धा समाविष्ट आहेत. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टी बदलत असते. जाणून घेऊया काय आहे नवीन नियम?

Saving account new rules: 2023 मध्ये झालेल्या बदलांमध्ये बँकेचे नियम सुद्धा समाविष्ट आहेत. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टी बदलत असते. यावेळी आरबीआयने बँक खात्याशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. ते जाणून घेऊया. 

कोणते आहेत अकाऊंटशी संबंधित नवीन नियम? (What are the new rules regarding accounts?)

आरबीआयच्या (RBI) नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या बँक खातेधारकांनी आधीच त्यांची valid डॉक्युमेंट सादर केली आहेत आणि त्यांच्या पत्त्यात कोणताही बदल झालेला नाही, त्यांना आता त्यांचे KYC करण्यासाठी डिटेल्स अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. 

आरबीआयचे म्हणणे आहे की केवायसी माहितीमध्ये कोणताही बदल न झाल्यास खातेधारक त्यांच्या ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम किंवा अन्य डिजिटल माध्यमातून स्व-घोषणा पत्र (Self-declaration letter) सादर करू शकतात.

कधी केली नवीन नियमांची घोषणा? (When was the new rules announced?)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी म्हणजेच 6 जानेवारी रोजी ही guiding principles issued केली आहेत. त्यात म्हटले आहे की केवायसी माहितीमध्ये कोणताही बदल न झाल्यास केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्यासाठी ग्राहकाचे स्व-घोषणा पत्र पुरेसे आहे.

आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, आरबीआयने बँकांना त्यांच्या ग्राहकांना नोंदणीकृत ईमेल आयडी, क्रमांक, एटीएम इत्यादीद्वारे स्वयं-घोषणा करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यांना बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही.