उत्तम घरांची बांधणी आणि रास्त किंमत या कारणामुळे म्हाडाच्या(MHADA) घराला लोकं प्राधान्य देतात. नवीन वर्षातील म्हाडाच्या घरांची लॉटरी निघाली असून अजूनही तुम्ही नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी(Registration) करा. बऱ्याच जणांना म्हाडाचे घर घेण्यापूर्वी अनेक प्रश्न पडतात. त्यापैकी एक म्हणजे म्हाडाचे घर भाड्याने देता येते का? तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.
म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का?
अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का? समजा तुम्ही म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आणि तुम्हाला घर लागलं, तर तुम्ही ते घर घेऊ शकता. तुम्हाला जर ते भाड्याने द्यायचे असेल तर तेही तुम्हाला देता येते. त्यासाठी तुम्हाला म्हाडाच्या प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घेऊन फ्लॅट भाड्याने देता येतो. प्लॅट भाड्याने देण्याआधी योग्य ती कागदपत्रे जमा करण्यासंदर्भात तुमच्या वकिलांचा सल्ला आवश्य घ्या.
नोंदणीची अंतिम मुदत जाणून घ्या
लाखो लोकांच्या स्वप्नातील घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी म्हाडाने घरांची लॉटरी काढली आहे. तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घरासाठी अर्ज करू शकता. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी असून पेमेंट करण्याची अंतिम मुदत ही 6 फेब्रुवारी 2023 असणार आहे. यावेळी म्हाडाने 21 कागदपत्रांऐवजी 7 कागदपत्र जमा करून ऑनलाईन पद्धतीने घरांची सोडत काढणार आहे. जर तुम्हालाही म्हाडाच्या लॉटरीकरिता अर्ज करायचा असेल तर तुम्ही lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता.
या तारखा नक्की लक्षात ठेवा
- 5 फेब्रुवारी 2023 - अर्ज करण्याचा शेवटचा दिवस
- 6 फेब्रुवारी 2023 - ऑनलाइन पेमेंटचा शेवटचा दिवस
- 13 फेब्रुवारी 2023 - ड्राफ्ट अॅप्लिकेशन पब्लिश
- 15 फेब्रुवारी 2023 - फायनल अॅप्लिकेशन
- 17 फेब्रुवारी 2023 - लॉटरी ड्रॉ
- 20 फेब्रुवारी 2023 - रिफंड