Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC द्वारे घरबसल्या बुक करता येणार बसचे तिकीट, कसे जाणून घ्या

IRCTC Bus Booking Services

Image Source : www.zeevector.com

IRCTC Bus Booking Service: आता 'IRCTC' द्वारे तुमच्या आवडीची बसमधील सीट ऑनलाईन पद्धतीने बुक करता येणार आहे. ही सेवा 22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिली जाणार आहे. या सेवेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

IRCTC Bus Booking Service: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या(IRCTC) ऑनलाईन बस बुकिंग सर्व्हिसद्वारे(Online Bus Booking Service) आता तुम्हालाही घरबसल्या तुमची आवडती सीट बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तिकीट बुक करण्याची चिंता आता दूर होणार आहे. आयआरसीटीसीने(IRCTC) आपल्या टूरिझम पोर्टल(IRCTC Tourism Portal) सोबत बस बुकिंग सेवा देखील सुरु केली आहे. आता ग्राहक www.bus.irctc.co.in किंवा Rail Connect अॅपवरून घरबसल्या तिकीट बुक करू शकणार आहेत. चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

किती राज्यांमध्ये सुविधा देण्यात येत आहे?

आयआरसीटीसीकडून(IRCTC) जानेवारी 2021 मध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून सध्या या माध्यमातून 50 हजारांपेक्षा जास्त बसेसच्या बुकिंगची सुविधा उपलब्ध होत आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी अशा दोन्ही बसचा समावेश करण्यात आला आहे. ही सेवा 22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिली जाणार आहे. यामध्ये प्रवाशांना आपल्या सोयीनुसार एसी, नॉन एसी आणि स्लीपर बस निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यासोबतच सीट आणि बोर्डिंग/ड्रॉपिंग पॉइंट देखील प्रवाशांना निवडता येणार आहे.

अशा प्रकारे करू शकता तिकीट बुक

  • www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर जा
  • तुम्हाला कुठून कुठे प्रवास करायचा आहे, ती दोन्ही ठिकाणं निवडा 
  • प्रवासाची तारीख निवडण्यासाठी तारखेवर क्लिक करा.
  • त्यानंतर प्रवासाचा कालावधी, बस सुटण्याची आणि इच्छित स्थळी पोहोचण्याची वेळ यासोबत त्या मार्गावर उपलब्ध बसचे पर्याय तुम्हाला पाहायला मिळतील 
  • तिकिटाची किंमत आणि किती सीट्स बुक करायच्या आहेत, याचे डिटेल्स दाखविले जातील
  • तुमच्या आवडीची सीट निवडल्यानतंर Proceed to book वर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला IRCTC लॉगिन किंवा गेस्ट युजर्स म्हणून लॉग इन करावे लागेल
  • तिकिटाचे शुल्क भरल्यानंतर तुमचे बसचे तिकीट ऑनलाईन बुक केले जाईल

एसएमएसद्वारे(SMS) मिळतील डिटेल्स

बस प्रवासासाठी सुटण्याच्या दोन तास अगोदर बस क्रमांक, संपर्क क्रमांक आणि बोर्डिंग पॉईंट क्रमांक एसएमएसद्वारे(SMS) पाठवण्यात येईल. तुमच्या खात्यातून पैसे कापल्यानंतरही तिकीट बुकिंग न झाल्यास 3 ते 5 कामकाजाच्या दिवसांत रक्कम परत करण्यात येईल. कोणत्याही तक्रारीसाठी किंवा चौकशीसाठी, तुम्ही 1800 110 139 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. एक प्रवासी 10 किलोपर्यंतचे सामान घेऊन सहज प्रवास करू शकेल. याशिवाय, त्यांना एक लॅपटॉप बॅग, हँडबॅग किंवा 5 किलोपर्यंतची ब्रीफकेस सोबत बाळगता येणार आहे.

तिकीट रद्द करण्याचा पर्याय आहे का?

बऱ्याच वेळा अनेक कारणास्तव आपल्याला प्रवास करणे शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही प्रवास करू शकत नसाल तर तुम्ही बसचे तिकीटही रद्द करू शकणार आहात. हे बसचे तिकीट ऑनलाईन रद्द करू शकता. तिकिटाचे पैसे 3 ते 4 दिवसात तुमच्या खात्यात पाठवले जातील. विशेष म्हणजे तुमची बस रद्द झाली किंवा बस चालक इतर कोणतीही बस देऊ शकत नसला तर तुम्हाला परतावा मिळणार आहे.