सप्टेंबरच्या अखेरीस 1.5 दशलक्षाहून अधिक कर्मचारी अॅमेझॉनशी संबंधित होते. सध्याच्या मंदीच्या काळात, Amazon ने 18,000 कर्मचार्यांना काढून टाकणे ही आतापर्यंतची सर्वात मोठी Layoff असेल. अलीकडेच याविषयी बातमी पुढे आली होती. आणि आता या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
Amazon Layoff सुरुवात, सीईओनी दिला दुजोरा
आयटी क्षेत्रातील दिग्गज अॅमेझॉनमध्ये Layoff प्रक्रिया सुरू झाली आहे. खुद्द कंपनीचे सीईओ अँडी जस्सी यांनी याला दुजोरा दिलेला आहे. त्यांनी म्हटले आहे की Layoff सुरू होत आहे आणि कंपनीतील 18 हजारहून अधिक कर्मचार्यांना याचा फटका बसेल.
भारतातील हजारो कर्मचाऱ्यांचाही समावेश
या प्रक्रियेत भारतातील हजारो कर्मचार्यांचाही समावेश आहे. यापूर्वीही काही रिपोर्ट्समध्ये असे संकेत मिळाले होते की कंपनी भारतातील 1 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. याचा परिणाम तांत्रिक, मानव संसाधन आणि इतर विभागांवर होणार आहे. गेल्या आठवड्यात, कंपनीचे सीईओ अँडी जॅसी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, कंपनी 18 जानेवारीनंतर Layoff मुळे प्रभावित कर्मचार्यांशी संवाद साधेल. गुरुग्राम-बेंगळुरू कार्यालयांमध्ये कर्मचारी कपात सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅमेझॉनच्या गुरुग्राम, बेंगळुरू आणि भारतातील इतर कार्यालयांमध्ये या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये तोट्यात असलेल्या विभागांना सर्वाधिक फटका बसला आहे. कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये फ्रेशर्स आणि अनुभवी अशा दोघांचाही समावेश आहे.
5 महिन्यांचा पगार मिळणार
संबंधित कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचा पगार मिळणार आहे. याबाबत पुढे आलेल्या माहितीनुसार, अमेझॉनने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचा अॅडव्हान्स पगार देणारा ईमेल पाठवला आहे. कर्मचार्यांना एका विशिष्ट तारखेला लीडर टीमला भेटण्यास सांगितले आहे. याविषयीच्या माहितीनुसार, Amazon वर नुकतीच सुरू झालेली कर्मचारी कपात प्रक्रिया येते काही आठवडे चालेल असा अंदाज आहे.
सध्याच्या मंदीच्या काळात, Amazon ने 18 हजार कर्मचार्यांना काढून टाकणे ही आतापर्यंतची सर्वात मोठी टाळेबंदी असेल. सप्टेंबरच्या अखेरीस 1.5 दशलक्षाहून अधिक कर्मचारी अॅमेझॉनशी संबंधित होते. कंपनीचे जगभरात अंदाजे 3 लाख 50 हजार कॉर्पोरेट कर्मचारी आहेत.