Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air Ticket Refund : …तर विमान कंपन्यांना द्यावा लागणार तिकिटाचा पूर्ण परतावा

Free Air Ticket

Air Ticket Refund : एअर तिकीट परताव्याचे नियम येणाऱ्या दिवसांमध्ये बदलू शकतात. खासकरून कंपनीच्या चुकीमुळे तुमच्या तिकिटाची श्रेणी बदलावी लागली असेल तर पुढचा विमान प्रवास तुम्हाला मोफत मिळेल…

तुमचं विमानाचं तिकीट (Air Ticket) बिझिनेस क्लासचं (Business Class) असेल. आणि विमान कंपनीने (Airliner) त्यांच्या चुकीमुळे ते खालच्या श्रेणीचं केलं. तर तुम्हाला तुमच्या तिकिटाचे पूर्ण पैसे (Total Refund) परत मिळतील. शिवाय कंपनीच्या पुढच्या विमानात तुमची मोफत सोयही (Free Ticket) करुन दिली जाईल. अशा प्रकारच्या नियमावलीवर सध्या DGCA म्हणजे नागरी विमान उड्डाण नियामक संस्था विचार करत आहे.      

लवकरच या संदर्भातलं सुधारित पत्रक काढू असं त्यांनी स्पष्ट केलंय.      

असा प्रस्ताव DGCA समोर होताच. आणि तो नियमांमध्ये बदलण्यावर नियामक संस्था आता गंभीरपणे विचार करतेय. .’मिळणाऱ्या परताव्यामध्ये तुमच्या कराचे पैसेही धरले जातील. त्यामुळे मिळणारा परतावा अगदी 100% असेल,’ असं DGCA चे अध्यक्ष अरुण कुमार म्हणाले.      

महत्त्वाचं म्हणजे हा नियम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीही लागू असेल. अरुण कुमार म्हणाले की, ‘भारतात येणाऱ्या किंवा भारतातून उड्डाण करणाऱ्या सर्व विमानांसाठी ही नियम लागू असेल. नागरी विमान उड्डाण अधिनियन (CAR)’ मध्ये तसे बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.’     

DGCAच्या पुढच्या बैठकीत सर्व सदस्यांमध्ये चर्चा होऊन या प्रस्तावार अंतिम निर्णय होईल. आणि पुढचा एक महिना विमान प्रवाशांनाही आपलं याविषयीचं मत नोंदवता येईल.      

अलीकडे भारतीय विमान कंपन्यांनी प्रवाशांची तिकिटं त्यांच्या मर्जीशिवाय बिझिनेस क्लासमधून इकॉनॉमी क्लासमध्ये बदलल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच्या वाढत्या तक्रारी DGCA कडे आल्या आहेत.      

जून महिन्यात एअर इंडिया कंपनीने विमानातल्या उपलब्ध बिझिनेस क्लास सीटपेक्षा जास्त लोकांना बिझिनेस क्लासचं तिकीट विकल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर झाल्या प्रकाराबद्दल एअर इंडियाला ताकीदही देण्यात आली.      

पण असे प्रकार इतरही कंपन्यांमधून ऐकायला मिळाल्यावर आता विमानकंपन्यांना चाप बसावा यासाठी कारवाईची तयारी DGCA करतंय.