Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Mudra Loan अंतर्गत 50,000 ते 9 लाखाचे मिळणार कर्ज, अर्ज करण्यासाठी सविस्तर वाचा

SBI Mudra Loan

SBI Mudra Loan: पीएम मुद्रा योजनेद्वारे तुम्ही अगदी मोजक्या कागदपत्रांसह स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 50 हजार ते 9 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

SBI Mudra Loan: नवीन वर्षात जर तुम्ही नवीन व्यवसाय(New Business) सुरु करण्यासाठी किंवा इतर आर्थिक गरज पूर्ण कारण्यासाठी बँकेमधून कर्ज(Bank Loan) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज आम्ही सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल(Government Scheme) माहिती देणार आहोत. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही 50,000 पासून 9 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज घेऊ शकता. चला तर जाणून घ्या या सरकारी योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

पीएम मुद्रा योजनेद्वारे तुम्ही अगदी मोजक्या कागदपत्रांसह स्टेट बँक ऑफ इंडियाकडून(SBI) 50 हजार ते 9 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता. या योजनेला SBI मुद्रा कर्ज(SBI Mudra Loan) असेही म्हणतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड(Aadhar Card) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) मध्ये खाते(Account) असणे गरजेचे आहे. याशिवाय तुमचा मोबाईल नंबर देखील खात्याशी जोडलेला असणे गरजेचे आहे. व्हेरिफिकेशन प्रक्रियेमध्ये ओटीपी मिळवण्यासाठी मोबाईल नंबर लिंक(Mobile Number Link) करणे आवश्यक असते. एसबीआय व्यतिरिक्त पीएम मुद्रा योजनेअंतर्गत इतर अनेक बँकांमध्येही कर्ज दिले जाते. मात्र येथे आम्ही तुम्हाला SBI मुद्रा कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती देणार आहोत.  

SBI मुद्रा कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?

  • यासाठी तुम्हाला SBI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी येथे  क्लीक करा
  • त्याठिकाणी होम पेजवर तुम्हाला Proceed For E-Mudra चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल
  • आता तुमच्यापुढे सर्व मार्गदर्शक तत्त्वे असतील ती वाचावी लागणार आहेत
  • यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये अर्जदारांना त्यांचा मोबाईल नंबर, SBI मुद्रा लोन ऑनलाईन अर्ज 2022 आणि कर्जाची हवी असलेली रक्कम टाकून सबमिट करावा लागेल
  • अर्जदारांना सर्व माहिती टप्प्या टप्प्याने भरावी लागणार आहे 
  • मागण्यात आलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील
  • त्यानंतर Submit पर्यायावर क्लिक करा
  • आता तुमच्या समोर welcome page ओपन होईल त्याची शेवटी प्रिंट काढा

SBI मुद्रा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
  2. आधार कार्ड
  3. उद्योग आधार तपशीलबँक खाते तपशील
  4. खरेदी केलेल्या मालमत्तेचे वर्णन
  5. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र
  6. स्थानिक प्रमाणपत्र
  7. मतदार आयडी
  8. ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट सारखा कोणताही आयडी पुरावा
  9. रहिवासी पत्ता प्रमाणपत्र
  10. वीज बिल
  11. बँक स्टेटमेंट 6 महिन्यांपर्यंत