Business Idea: कोविड महामारीनंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याकडे तरुणांचा कल झालेला पाहायला मिळत आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून वेळोवेळी वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम यासंदर्भात राबवण्यात येतात. जर तुम्ही देखील स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. यासाठी तुम्हाला सरकार मदत करणार आहे.
केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री संजीव बल्यान(Sanjeev Balyan) यांनी मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाकडून(The Union Minister of State for Fisheries, Animal Husbandry and Dairying) माहिती घेऊन तरुणांनी स्वत:चा व्यवसाय(Business) सुरू करण्याबाबत सांगितले आहे. सरकारी योजनेचा लाभ घेऊन तरुण उद्योजक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. चला तर सरकारच्या या योजनेबद्दल जाणून घेऊयात.
राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना
राष्ट्रीय गोकुळ मिशन(Rashtriya Gokul Mission) ही सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या माध्यमातून गाय, म्हैस, डुक्कर, कोंबडी, शेळीपालन फार्म आणि सायलेज युनिटला अनुक्रमे 4 कोटी, 1 कोटी, 60 लाख, 50 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. एकूण रकमेपैकी 50% अनुदान भारत सरकार देईल आणि त्याव्यतिरिक्त, AHIDF योजनेअंतर्गत कर्जाच्या रकमेवर 3 टक्क्यांपर्यंत व्याज सवलत देखील मिळणार आहे.
देशी गायींच्या संगोपनाला प्रोत्साहन
डॉ. संजीव बल्यान यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा विभागात 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देण्यात येईल. राष्ट्रीय गोकुळ मिशन(Rashtriya Gokul Mission) अंतर्गत देशी गायींच्या संगोपनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यातील एकूण 90,598 नोकऱ्यांपैकी 16,000 तरुणांना मैत्री योजनेअंतर्गत रोजगार मिळाला आहे. देशामधील तरुणांना मंत्रालयाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जनावरांच्या उपचारासाठी 4,332 हून अधिक फिरते पशुवैद्यकीय युनिट सुरू करण्यात येत आहे.
तरुणांच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल
प्रस्तावित 'नवीन राष्ट्रीय युवा धोरण('New National Youth Policy)' हे देशातील तरुणांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामध्ये तरुणांच्या विकासासाठी 10 वर्षांचा विचार केला गेला आहे. या योजनेंतर्गत शिक्षण, रोजगार, उद्योजकता यासह पाच क्षेत्रांत व्यापक काम केले जाणार आहे.