Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'Jan Dhan Account' उघडताच मिळणार आहेत 10,000 रुपये, कसे ते जाणून घ्या

PMJDY

Image Source : www.rightsofemployees.com

Jan Dhan Account: पंतप्रधान जन-धन योजने अंतर्गत देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे.

Jan Dhan Account: केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी पंतप्रधान जन-धन योजनेला(PMJDY) आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेद्वारे देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे. या योजनेअंतर्गत लाखो गरीब कुटुंबांची बँकांमध्ये खाती(Bank Account) उघडण्यात आली असून आतापर्यंत सुमारे 46.25 कोटी लोकांची खाती उघडली आहेत. पण तुम्हाला ठाऊक आहे का? Jan Dhan Account उघडताच 10,000 रुपयांचा लाभ होणार आहे. कसा तर जाणून घ्या.

प्रधानमंत्री जन धन योजने(PMJDY) अंतर्गत झिरो बॅलन्समध्ये(Zero Balance) खाते उघडता येते. या अकाऊंटच्या माध्यमातून अपघाती विमा, ओव्हरड्राफ्टची सुविधा, चेकबुक सारख्या अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. या योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती अनेकांना नसते. आपल्याला हे खाते बँकिंग, बचत, कर्ज, विमा, पेन्शन यासाठी वापरता येते.

अकाउंटमध्ये पैसे नसतानाही काढता येतील 10,000 रुपये

जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये पैसे नसले तरीही 10,000 रुपये काढता येतात. याआधी ही लिमिट 5,000 रुपयांपर्यंत होती. मात्र सरकारने आता ती वाढवून 10,000 रुपयांपर्यंत केली आहे.

यासाठीचे नियम काय सांगतो?

या खात्यामध्ये ओव्हरड्राफ्टची(Overdraft) सुविधा मिळण्यासाठी 65 वर्षे वयोमर्यादा आहे. मात्र, ही ओव्हरड्राफ्टची सुविधा आपले जन धन खाते 6 महिन्यांचे झाल्यानंतरच घेता येते.  मात्र यावेळी फक्त 2,000 रुपये काढता येतील.

अशा प्रकारे उघडा खाते

जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये लोकांना खाते उघडता येते. जर आपल्याला हवे असेल तर खाजगी बँकेतही(Private Bank) खाते उघडता येऊ शकते तसेच, जर आपल्याकडे आधीच बचत खाते असेल तर ते जन धन खात्यामध्ये रूपांतरित देखील करता येते. 10 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या कोणत्याही भारतीय नागरिकाला जन धन खाते उघडता येते.