झोमॅटो (Zomato) या अन्नपदार्थांची ऑनलाईन डिलिव्हरी (Online Food Delivery) करणाऱ्या कंपनीचे सीईओ दिपिंदर गोयल (Dipender Goyal) यांनी आपल्या कार्यालयाला वॉर रुम (War room) म्हटलं आहे. आणि असं ते का म्हणतात ते दाखवणारे फोटो त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. न्यू ईयरच्या (New Year) आठवड्यात कंपनीकडे येणाऱ्या ऑनलाईन ऑर्डर (Online Food Orders) वाढल्या आहेत. आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर काम करावं लागत आहे.
त्यामुळेच झोमॅटो ऑफिसला छावणीचं स्वरुप आल्याचं गोयल म्हणतात. एका फोटोत काही कर्मचारी चक्क खाली जमिनीवर बसून काम करताना दिसतायत. आणि एका फोटोत कंपनीने दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केलेली सोय दिसते आहे. कर्मचाऱ्यांसाठी मागवलेली शीतपेयं आणि कॅडबरी या फोटोत दिसतात. ‘कर्मचाऱ्यांना साखरेचा पुरवठा व्हावा आणि ऊर्जा मिळावी यासाठी,’ असं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिपेंदर गोयल यांनी म्हटलं आहे.
न्यू ईयरच्या काळात ऑनलाईन फूड डिलिव्हरी बिझिनेस तेजीत असतो. आणि मागची दोन वर्षं झोमॅटोने याच काळात चांगल्या ऑर्डर मिळवल्या होत्या. 2021 मध्ये 31 डिसेंबरला झोमॅटोकडे तब्बल 20 लाख ऑर्डर आल्या होत्या. आणि यावर्षीही तो ओघ सुरूच असल्याचं दिसतंय.
‘खानपान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचं हे असं असतं. अख्खं जग सेलिब्रेट करत असताना आम्ही त्यांच्या सेवेसाठी झटत असतो,’ असं दिपेंदर याविषयी बोलताना म्हणाले होते. आणि हे ट्विट त्यांनी गेल्यावर्षी 1 जानेवारीला पहाटे 4 वाजता केलं होतं.
त्यांचा अंदाज यावर्षीही बरोबर निघालाय. आणि 2022 मध्ये 31 डिसेंबरला रात्री नऊ वाजेपर्यंत झोमॅटो कंपनीने 91 कोटी रुपयांच्या ऑर्डर पोहोचवलेल्या होत्या.