Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023 : सोन्याच्या वाढत्या दरानं यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मागणी मंदावणार?

Akshaya Tritiya 2023 : सोन्याच्या वाढत्या दरानं यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मागणी मंदावणार?

Akshaya Tritiya 2023 : सोन्याचे वाढते भाव पाहता यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) सोन्याचा दर 60,230 रुपये प्रति तोळ्यावर (10 ग्रॅम) व्यवहार करत होता. यंदा सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळतेय.

अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya) सोन्याची खास मागणी असते. सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ असते. यंदा मात्र या सोन्याच्या किंमती तब्बल 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. या वाढलेल्या किंमतीमुळे गुंतवणूकदारांनी (Investors) त्यांची खरेदी पुढे ढकललीय. मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळतेय. जानेवारीत सोन्याचा दर (Gold rate) 54,000च्या आसपास होता. त्यावेळी मागणी कमी होती, असं बीएमपी परिबाचे  

सोन्याच्या किंमतीचा मार्ग आणि अक्षय्य तृतीयेचा प्रभाव

जानेवारीमध्ये, जेव्हा किंमती प्रति दहा ग्रॅम रुपये 54,000 च्या आसपास होत्या, तेव्हा मौल्यवान धातूची किरकोळ मागणी कमी होती, असे बीएनपी परिबाच्या प्रवीण सिंग यांनी सांगितलं. या वर्षी सोन्याच्या किंमती 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यामुळे 22 एप्रिलला असणाऱ्या अक्षय्य तृतीयेसाठी सोन्याच्या दागिन्यांची विक्री मंद राहील, असा आमचा अंदाज आहे, असं अॅक्सिस सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट - कमोडिटीज देवेया गगलानी म्हणाले.

एमसीएक्सवर सोनं कमी होण्याची आशा

ट्रेडबुल्स सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी अॅनालिस्ट भाविक पटेल म्हणाले, की पुरवठा मजबूत असल्यामुळे घाऊक बाजारातून सुमारे 3 डॉलर प्रति औंसच्या सवलतीवरून मागणीचा अंदाज येवू शकतो भाविक पटेल यांच्या मते, गुंतवणूकदारांनी मोठ्या रकमेनं सोनं खरेदी करण्याकडे लक्ष देण्याआधी एमसीएक्सवर सोनं प्रति दहा ग्रॅम 2,000 रुपयांनी खाली यायला हवं.

विविध टप्प्यात सोनं खरेदी

गुंतवणूकदारांनी आपली सोनेखरेदी थांबवावी. ती विविध टप्प्यांत करावी. म्हणजे ऐन सणासुदीत मागणी प्रचंड वाढल्यानं वाढत्या किंमतीचा फटका बसणार नाही. पारंपरिक दृष्टीनं विचार केल्यास सोनं ही एक सुरक्षित गुंतवणुकीची वस्तू आहे. तर ही अक्षय्य तृतीया आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोनं जोडण्यासाठी योग्य वेळ असू शकते, असं प्रवीण सिंह म्हणाले. राजकीय अनिश्चितता, बँकिंग संकटं आणि आर्थिक घडामोडी यामुळे सोन्याच्या किंमती आणखी वाढू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.

गोल्ड ईटीएफ पर्याय फायद्याचा?

आयसीआयसीआय प्रुडेंशियल एएमसीचे गुंतवणूक धोरण प्रमुख चिंतन हरिया म्हणाले, की अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे. गोल्ड ईटीएफमध्ये हाय लिक्विडीटी समाविष्ट आहे. गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओच्या 10 टक्क्यांपर्यंत गोल्ड ईटीएफचा विचार करू शकतात.

सोन्याची आगामी काळातली कामगिरी कशी?

आगामी काळात सोन्याच्या किंमतीत काही सुधारणा होऊ शकतात. सोन्याचा दर 1,900 ते 1,950 डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त होतेय. हाच दर 2,000/औंसच्या किंमतीच्या 3 ते 5 टक्के कमी होईल. सोन्याच्या किंमतीतली ही घसरण जागतिक घडामोडींमुळे होण्याचा अंदाज आहे. फेडरल रिझर्व्हनं मौल्यवान धातूंबद्दल विशेषत: सोन्याचा व्याजदर वाढवण्याचा आपला इरादा स्पष्ट केलाय. त्यानंतर सोन्याच्या किंमतीत वेगवान वाढ मंदावल्याचं दिसतं. याशिवाय यूएस डॉलर इंडेक्स 102च्या वर गेलाय. 10 वर्षांच्या यूएस ट्रेझरी उत्पन्नात 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झालीय. या दोन्ही गोष्टींचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो, असं देवेया गगलानी म्हणाले.