Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023 Gold Buying: होय! अगदी 1 रुपयात देखील तुम्ही सोने खरेदी करु शकता, कसे ते जाणून घ्या

Akshaya Tritiya 2023

Akshaya Tritiya 2023 Gold Buying:जागतिक पातळीवरील तेजीने सोन्याच्या किंमतीने रेकॉर्ड पातळी गाठली आहे. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला सोन्याची खरेदी करता येणार नाही, असा बहुतेकांनी विचार केला असेल.मात्र अगदी 1 रुपयापासून सोन्याची खरेदी करण्याचा पर्याय आहे. एमएमटीसी-पीएएमपी या कंपनीच्या वेबसाईटवर डिजिटल सोने खरेदी करुन अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधता येईल.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेसाठी (Akshaya Tritiya 2023) मुंबईतील सराफा बाजार सज्ज झाला आहे.बाजारात टॉप ज्वेलर्सनी सोने आणि डायमंड ज्वेलरीवर विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत. जागतिक पातळीवरील तेजीने सोन्याच्या किंमतीने रेकॉर्ड पातळी गाठली आहे. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला सोन्याची खरेदी करता येणार नाही, असा बहुतेकांनी विचार केला असेल. मात्र अगदी 1 रुपयापासून सोन्याची खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. एमएमटीसी-पीएएमपी (MMTC-PAMP) या कंपनीच्या वेबसाईटवर डिजिटल सोने खरेदी करुन अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधता येईल.

डिजिटल सोने विक्रीतील आघाडीची कंपनी आणि भारतातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी असेलल्या एमएमटीसी पीएएमपी  वेबसाईटवर सोने आणि चांदीची विक्री करते.या मंचावरुन ग्राहकांना अगदी 1 रुपयापासून सोने खरेदी करता येऊ शकते. सोने आणि चांदीच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न असल्याने वेबसाईटवर सोने आणि चांदीचा भाव सतत बदलत असतो. या वेबसाईटवर केवळ 24 कॅरेट शुद्ध सोन्याची आणि चांदीचा डिजिटल स्वरुपात विक्री केली जाते. वर्षाचे 365 दिवस 24 तास या प्लॅटफॉर्मवर सोने खरेदी करता येईल. 

डिजिटल गोल्डची डिलिव्हरी घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याशिवाय जेव्हा वाटेल तेव्हा ग्राहक याची विक्री करु शकतो किंवा आपल्या नातलगांना सोने ट्रान्सफर करु शकतो. तसा ट्रान्सफरचा ऑप्शन वेबसाईटवर देण्यात आला आहे. सोन्याची डिलिव्हरी घ्यायची असल्यास त्यावर चार्जेस द्यावे लागतात. 

mmtc-home-page.jpg

पाच वर्षांपर्यंत वॉलेटमध्ये एकही रुपया शुल्क न देता सोने साठवू शकता

ग्राहकाने खरेदी केलेले सोने बँकेने इन्शुरर्ड केलेल्या वॉलेटमध्ये सुरक्षित ठेवले होते.वॉलेटमध्ये जमा होणाऱ्या सोन्याच्या सुरक्षेसाठी युनिव्हर्सल ट्रस्टीशीप सर्व्हिसेस लिमिटेड (UTSL) या ट्रस्टवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बँकेच्या लॉकर्समध्ये सोने ठेवल्यास त्यावर लॉकर शुल्क अदा करावे लागते. मात्र इथे 'एमएमटीसी-पीएएमपी'कडून वॉलेट सुविधा नि:शुल्क पुरवली जाते. पाच वर्षांपर्यत या वॉलेटमध्ये सोने साठवता येऊ शकते.    

डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • https://www.mmtcpamp.com या बेवसाईटवर जा. 
  • डिजिटल गोल्ड किंवा सिव्हरचा पर्याय निवडा. 
  • मोबाईल नंबरचा तपशील द्या.
  • OTP सादर केल्यानंतर थेट खरेदीचा पर्याय येईल.
  • तुम्हाला पत्ता सादर करावा लागेल. 
  • KYC ची प्रक्रिया पूर्ण करुन तुम्ही प्रॉफाईल तयार करु शकता. 
  • किती रुपयांचे सोने खरेदी करणार तो पर्याय निवडा. 
  • पेमेंटसाठी विविध डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, क्यूआर कोड असे पर्याय येतील. 
  • पेमेंट पूर्ण केल्यानंतर खरेदी केलेले डिजिटल गोल्ड तुमच्या वॉलेटमध्ये जमा होईल.
  • एमएमटीसी-पीएएमपी साईटवर तुमच्या प्रोफाईलमध्ये गोल्ड होल्डिंग स्टेटमेंटवरुन तुम्हाला सोने खरेदीचा तपशील मिळेल.
    headimage-21-04-23-16.jpg

डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे फायदे

  • एमएमटीसी  पीएएमपी या कंपनीकडून 24 कॅरेट शुद्ध सोन्याची ऑनलाईन विक्री केली जाते.  
  • या प्लॅटफॉर्मवर सोने खरेदी आणि विक्री ही वर्षातील 365 दिवस 24 तासांत केव्हाही करु शकतो.
  • सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारभावाशी संलग्न आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील घटनांचा यावर परिणाम होत नाही.
  • सोने खरेदीवर 3% वस्तू आणि सेवा कर (GST) लागू होतो.
  • 18 वर्षांवरील प्रौंढ व्यक्तीच डिजिटल सोने खरेदी आणि विक्री करु शकतात. यात जॉइंट अकाउंटला परवानगी नाही.
  • एका दिवसात या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांचे सोने खरेदी करण्याची मर्यादा आहे.
  • खरेदी केलेल्या सोन्याची डिलिव्हरी देखील मिळते.
  • सोने खरेदी करणे, डिलिव्हरी, रिडीम करणे आणि ट्रान्सफर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.