Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या

Digital Gold Investment

Digital Gold Investment : महागाईवर मात करण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे बघितलं जातं. आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करणे किंवा सोने विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड आहे. आता डिजिटल माध्यमातूनही सोन्यात गुंतवणूक केली जाते.

Digital Gold Investment Options : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, आणि या दिवशी कुठलीही वस्तू खरेदी केल्यास ती अक्षय्य ठरते, म्हणजेच तिची वाढ होते, अशी श्रध्दा भारतीयांमध्ये आहे. आता सराफा दुकानात जाऊन भौतिक सोने खरेदी करण्यापेक्षा इतरही अनेक माध्यमांतून सोने खरेदी केले जाते.  ग्राहकाला जर केवळ गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने खरेदी करायचे असेल तर, आजच्या या डिजिटल युगात त्याच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

डिजिटल सोने

डिजिटल स्वरुपातील सोनं ग्राहक ऑनलाईन खरेदी करू शकतात. हे सोनं विक्रेत्याकडून इन्शुअर्ड व्हॉल्टसमध्ये संग्रहित केलं जातं. ग्राहक अगदी पेटीएम, गुगल पे आणि फोन पे या अॅपचा वापर करून, आपल्या स्मार्टफोनवरुन डिजिटल गोल्डची खरेदी करू शकतात. यामाध्यामातून आपण अगदी कमीत कमी किमतीचे सोने विकत घेऊ शकतो. तसेच ब्रोकरेज फर्म आणि वित्तीय संस्थाकडून डिजिटल सोने खरेदी केल्या जाऊ शकते. डिजिटल सोने हे 100 टक्के अस्सल, सुरक्षित आणि विमा असलेले सोनं असते.

गोल्ड ईटीएफ

गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (Gold ETF) हा गेल्या काही वर्षांपासून सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. हे एक ओपन एंडेड म्युच्युअल फंड असतात. हे फंड सोन्याच्या वाढत्या आणि घसरत्या किमतींवर आधारित असतात. Gold ETF हे इतर स्टॉक्सप्रमाणेच बीएसई आणि एनएसईवर खरेदी आणि विकले जाऊ शकतात. यामध्ये सोन्याच्या शुद्धतेची 100 टक्के हमी दिली जाते.

गोल्ड म्युच्युअल फंड

गोल्ड म्युच्युअल फंड सोन्याच्या खाणकाम,प्रक्रिया,फॅब्रिकेशन आणि वितरणामध्ये गुंतलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. गोल्ड फंडांची कामगिरी या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीच्या चढ-उतारावर अवलंबून असते. इन्वेस्को इंडिया गोल्ड फंड, एसबीआय गोल्ड फंड, HDFC गोल्ड फंड, कोटक गोल्ड फंड, अॅक्सिस गोल्ड फंड, निप्पॉन इंडिया गोल्ड सेव्हिंग फंड, क्वांटम गोल्ड सेव्हिंग्स फंड, IDBI गोल्ड फंड, ICICI प्रुडेन्शियल रेग्युलर गोल्ड सेव्हिंग्स फंड (FOF), आदित्य बिर्ला सन लाइफ गोल्ड फंड ही सध्याच्या टॉप गोल्ड म्युच्युअल फंडाची नावे आहेत.

सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB)

सार्वभौम सुवर्ण रोखे कडे याकाळातील भौतिक सोन्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून उदयास आले आहेत. सार्वभौम सुवर्ण रोखे हे सरकारी रोखे आहेत. हे रोखे सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केले जातात. यावर दरवर्षी 2.5 टक्के व्याजही मिळते.