Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023 : पुढच्या अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याचा भाव 70,000 रुपयांवर पोहोचणार?

Akshaya Tritiya 2023 : पुढच्या अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याचा भाव 70,000 रुपयांवर पोहोचणार?

Akshaya Tritiya 2023 : सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. मागच्या काही काळात बाजारातल्या अनिश्चित वातावरणामुळे सोन्याचा परतावा डॉलरच्या बाबतीत अनुकूल नव्हता. अमेरिकन डॉलरची ताकद, कमी चलनवाढीच्या अपेक्षा त्याचप्रमाणं इक्विटीची कामगिरी अशा कारणांमुळे सोनं अनिश्चित वाटत होतं.

पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणं, एकूण जोखीम संतुलित करणं यात सोन्याचा वाटा मोठा आहे. इतर कोणत्याही गुंतवणुकीप्रमाणं सोन्याची कामगिरी बाजारातली परिस्थिती आणि इतर घटकांवर अवलंबून असते, ती बदलू शकते. मागच्या वर्षी म्हणजेच 2022मध्ये, जागतिक अनिश्चितता असूनदेखील सोन्यावरचा परतावा डॉलरच्या बाबतीत गुंतवणूकदारांसाठी अनुकूल नव्हता. अमेरिकन डॉलरची ताकद, कमी चलनवाढीच्या अपेक्षा आणि इक्विटी अशा काही कारणांमुळे हे घडलं. तर 2023 वायटीडीमध्ये (Year to date), एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) 7.5 टक्के आणि आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डसाठी 8 टक्के परताव्यासह सोन्यानं चांगली कामगिरी केली. सध्या एमसीएक्सवर सोन्याच्या किंमती 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर व्यवहार करताना दिसून येत आहेत. तर तज्ज्ञांच्या मते, सोन तेजीत आहे. पुढच्या काळात ते आणखी तेजीत राहू शकतं.

अजून दर वाढणार

पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याच्या किंमती 10 ग्रॅमला 68000 रुपयांच्या दिशेनं जाण्याची आमची अपेक्षा आहे. ते 57,000-58,000 10 ग्रॅम दरापर्यंत घसरल्यास गुंतवणूकदारांना सोनं जमा करण्याचा सल्ला दिला जातो, असं एंजलवननं अक्षय तृतीया गोल्ड स्पेशल रिपोर्टमध्ये सांगितलं. 68,000 ते 68,500 रुपये (2,270- 2,290 डॉलर) अशाप्रकारचा स्तर पाहायला मिळू शकतो, असं रिपोर्टमध्ये सांगितलंय. तर 72,200 रुपये (2,410 डॉलर) अशी पुढची पातळी असू शकते, असं अॅक्सिस सिक्युरिटीजमधील एचएनआय आणि एनआरआय कमोडिटीज हेड प्रीतम पटनायक म्हणाले. मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी त्यांनी 65,000 रुपयांचं लक्ष्य दिलंय.

मध्यवर्ती बँकेची स्थिती

वाढते व्याजदर तसंच त्याचा मोठा कालावधी, बँकांची स्थिती आणि कोसळणारा डॉलर निर्देशांक यामुळे मंदीची शक्यता वाढते. त्यामुळे सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. याचंच प्रतिबिंब सोन्याच्या दरामध्ये दिसून येतंय. नजीकच्या काळात ते 65000 पर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. दुसरीकडे महागाई विरुद्ध मध्यवर्ती बँकेचा लढा अजूनही चालू आहे, असं पटनायक म्हणाले.

संभाव्य गुंतवणूकदारांसाठी आव्हान

अक्षय्य तृतीया नेहमीप्रमाणंच चैतन्यपूर्ण असेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे संभाव्य गुंतवणूकदारांसाठी हे एक आव्हान आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्याच्या पारंपरिक प्रथेवर परिणाम होतोय. आम्ही प्रतिकात्मक खरेदी सुरू ठेवण्याची अपेक्षा करतो आहोत. मात्र क्वांटम कमी होऊ शकतो. यामुळे एकूण मागणीवर नकारात्मक परिणाम करू शकतो. गेल्या वर्षी आमच्या अंदाजित किंमतीच्या ट्रेंडनुसार सोन्यानं 14.3 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती, असंही त्यांनी सांगितलं.

सध्या सकारात्मक वातावरण

अक्षय्य तृतीयेच्या आधी साधारणपणे गेल्या आठवड्यापासून एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव 61,350 रुपयांच्या पातळीवरून 60,000 रुपयांच्या जवळ आहे. सोन्यासाठी सध्या सकारात्मक वातावरण आहे. मध्यवर्ती बँकाही सोनं खरेदी करत आहेत. अलीकडच्या काळात सोनं खरेदीच्या पद्धतीही वाढल्या आहेत, असं एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी संशोधन विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी स्पष्ट केलं. एकूणच सोन्याची सध्याची स्थिती पाहता भविष्यातही सोन्याचा दर चढाच राहणार, हे मात्र खरं.