Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nirav Modi: का करावा लागतोय नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव?

Nirav Modi

Image Source : www.businesstoday.in

Nirav Modi: राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामार्फत नीरव मोदीच्या मालमत्तांची लिलावात विक्री करून पैसे वसूल केले जात आहेत. ईडीने आतापर्यंत 6 कोटी रुपयांची वसुली करून ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेकडे(PNB) दिली आहे.

Nirav Modi: सध्या पुन्हा एकदा नीरव मोदी(Nirav Modi) चर्चेत आलायं. आपल्या सगळ्यांनाच नीरव मोदी हे नाव चांगलाच परिचयाचं आहे. हा तोच व्यक्ती आहे, ज्याने पंजाब नॅशनल बँकेला(PNB) 11, 360 कोटींचा चुना लावला होता आणि तो फरार झाला होता. यावेळी तो पुन्हा चर्चेत येण्याचं कारण आहे, त्याच्या 1000 कोटी किमतीच्या मालमत्तेचा लिलाव. पण हा लिलाव करण्याची का वेळ आलीये आणि नेमकं हे प्रकरण काय? चला जाणून घेऊयात.

PNB घोटाळा नक्की काय आहे?(What exactly is the PNB scam?)

हे प्रकरण थोडक्यात समजून घ्यायचे झाले तर, भारतातील सार्वजनिक बँकांपैकी एक पंजाब नॅशनल बँकेच्या(PNB) मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत 11, 360 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या गैरव्यवहारात बँकचे कर्मचारी देखील सामील होते. 2011 ते 2018 अशी सात वर्षं या घोटाळ्यादरम्यान कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. याप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी(Nirav Modi) यांचं नाव पुढे आलं. नीरव मोदी याने पीएनबी बँकेकडून 11, 360 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं ते न चुकवता 2018 साली त्याने देशाबाहेर पळ काढला होता. या पैशातून त्याने ठीक ठिकाणी मालमत्ता खरेदी केली होती. त्याला 19 मार्च 2019 रोजी लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. मोदीला सध्या लंडनच्याच तुरुंगात ठेवण्यात आले असून त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

1,000 कोटी रुपयाच्या मालमत्तेचा लिलाव(1,000 crore property auction)

फरार हिरे व्यापारी नीरव मोदी(Nirav Modi) याच्या मुंबईतील मालमत्तांची एकत्रित किंमत 1 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. ज्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे, त्यामध्ये दक्षिण मुंबईतील काळा घोडा येथील प्रसिद्ध रिदम हाऊसचा(Rhythm House) समावेश करण्यात आला आहे. रिदम हाऊस व्यतिरिक्त मोदीचा नेपिअन्सी रोडवरील फ्लॅट, कुर्ल्यातील कार्यालयीन इमारतीचा लिलाव केला जाणार आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामार्फत(National Company Law Arbitration) या मालमत्तांची लिलावात विक्री करून पैसे वसूल केले जातील. 
ईडीने(ED) आतापर्यंत 6 कोटी रुपयांची वसुली करून ही रक्कम पंजाब नॅशनल(PNB) बँकेकडे देण्यात आली आहे. गाड्या, चित्रे आणि अन्य महागड्या वस्तूंचा लिलाव करून ही रक्कम वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या वस्तूंच्या लिलावानंतर ईडीने 3 मालमत्तांच्या लिलावासाठी आपली हरकत नसल्याचेही जाहीर केले आहे. टप्प्याटप्प्याने या मालमत्तांचा लिलाव करण्यात येत असून मिळालेली रक्कम PNB बँकेला आणि सरकारला परत केली जाणार आहे. नीरव मोदी याने बँकांना चुना लावत जमा केलेल्या रकमेतून सगळ्या मालमत्ता विकत घेतल्या होत्या, त्यामुळे याच मालमत्तांची विक्री करून त्याचे पैसे वसूल केले जात आहेत