पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीने अखेर लंडन हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची विनंती नीरव मोदी याने कोर्टाकडे केली आहे.
सुमारे 14 हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीचा भारतीय तपास यंत्रणांकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी होणार आहे. यासाठी नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यात यावं, अशी भारताची मागणी होती.लंडनमधील उच्च न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. त्यामुळे सीबीआय आणि ईडी या तपास यंत्रणांसाठी हा निकाल महत्वपूर्ण होता.
नीरव मोदी सध्या लंडनमध्ये तुरुंगात आहे. त्याने या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करुन घेण्याची विनंती कोर्टाला केली आहे. आपली मानसिक स्थिती ढासळली असून प्रत्यार्पणाला नीरव मोदीने विरोध केला आहे. मात्र कोर्टाने त्यावर समाधान व्यक्त करत प्रत्यार्पणाला परवानगी दिली होती.
हायकोर्टानं नीरव मोदीची विनंती फेटाळून लावली तर त्याला भारतात आणण्याचा शेवटचा अडथळा देखील मोकळा होईल. नीरव मोदीला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवले जाणार आहे. यासाठी आर्थर रोड जेलमधील बराक क्रमांक १२ मध्ये वैद्यकीय सुविधांसह नीरव मोदीला ठेवण्याची व्यवस्था जेल प्रशासनाने केली आहे.