Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'One Rank One Pension' योजना पुन्हा चर्चेत का आलीये?

One Rank One Pension

One Rank One Pension: 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनेतील सुधारणेचे श्रेय राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेला जाते असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

One Rank One Pension: सध्या सोशल मीडियावर 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सुधारणेमुळे तब्बल 25 लाख जणांना याचा फायदा  होणार असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी ट्वीट करून माहिती दिली. मात्र सध्या 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजना चर्चेत येण्याचं कारण थोडं वेगवेगळं आहे. ही योजना चर्चेत येण्याचं आणि ट्रेंडिंग होण्याचं कारण चला जाणून घेऊयात.

‘OROP’ योजना पुन्हा चर्चेत येण्याचं कारण काय?

भारत जोडो यात्रे(Bharat Jodo Yatra) दरम्यान राहुल गांधींनी हरियाणातील नूह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथे 21 डिसेंबर रोजी माजी सैनिकांची भेट घेतली. यावेळी माजी सैनिकांनी राहुल गांधींना त्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. या भेटीनंतर माजी सैनिकांच्या मागण्या या प्रकाशझोतात आल्या आणि अगदी काही दिवसांनीच ओआरओपी(OROP) योजनेंतर्गत निवृत्ती वेतन सुधारण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतल्याचा दावा शनिवारी विरोधी पक्षाने केला. हा निर्णय ऐतिहासिक असून भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी माजी सैनिकांची भेट घेतल्यामुळे मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे.  
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर एक प्रेस रिलीज शेअर केली आणि त्यामध्ये म्हटले आहे की, “ओआरओपी की कालक्रम समझिए (ओआरओपी कालक्रमानुसार समजून घ्या). या सुधारणेसाठी भारत जोडो यात्रेचे(Bharat Jodo Yatra) मोठे योगदान आहे.

सत्ताधाऱ्यांचं यावर म्हणणं काय?

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केलेल्या ट्विटरवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी भारत जोडो यात्रेला(Bharat Jodo Yatra) क्रेडिट लेलो(Credit Lelo Yatra) यात्रा असं म्हंटल आहे. जयराम रमेश यांच्यावर निशाणा साधत भाजप नेते सीटी रवी म्हणाले, “भ्रष्ट राजवंशाची सेवा करणे हा आमच्या अस्तित्वाचा एकमेव उद्देश आहे. काँग्रेसने केलेले हे मूर्ख ट्विट वाचून मला हसू आवरता येत नाहीये. आमच्या पक्षाने सांगितल्याप्रमाणे OROP संदर्भातील गोष्टी सरकारने पूर्ण केल्या आहेत. परंतु प्रत्येकवेळी या दयनीय लोकांना याचे क्रेडिट घ्यायचे असते.

भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले, “जयराम रमेश जी यांना सर्वच श्रेय हवे आहे! याला ‘क्रेडिट ले लो(Credit Lelo Yatra)’ यात्रा म्हणता येईल. काँग्रेसला OROP साठी 43 वर्षे, NWM 50 वर्षांसाठी नाकारण्याचे श्रेय देता येईल तसेच राफेल/बुलेट प्रूफ जॅकेट नाकारणे, पिटाई सारखे शब्द वापरून सेनेच्या मनोबलावर हल्ला करणे व घोटाळे कारण्याचे श्रेयही देता येईल.”

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्रजी आणि राजनाथजी व सर्व दिग्गजांना माजी निवृत्त सैनिकांच्या कुटुंबियांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. गेल्या साडेसहा दशकांपासून काँग्रेस सरकारने OROP देण्यास नकार दिला होता. परंतु नरेंद्र मोदींनी 2015 मध्ये OROP ला जास्त किंमत असूनही मान्यता दिली ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे.