Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवालांना 13 मजली आलिशान घर बांधण्यासाठी 4 वर्ष थांबायला का लागलं होतं? हे आहे खरं कारण

Rakesh Jhunjhunwala

Rakesh Jhunjhunwala: गेल्याच वर्षी राकेश झुनझुनवाला यांनी मुंबईतील मलबार हिल येथे नवीन 13 मजली आलिशान घर बांधलं आहे, हे आपल्या सांगल्यानाच माहित आहे. पण हे घरं बांधण्यासाठी 4 वर्ष त्यांना का थांबावं लागलं होतं? जाणून घेण्यासाठी वाचा.

Rakesh Jhunjhunwala: भारताचे वॉरेन बफे(Warren Buffett of India) म्हणून राकेश झुनझुनवाला(Rakesh Jhunjhunwala) यांना ओळखले जाते. यांचा समावेश देशातील सर्वात यशस्वी गुंतवणुकदार आणि श्रीमंत व्यक्तींमध्ये(Most Successful Investors and Richest People) केला जातो. गेल्याच वर्षी राकेश झुनझुनवाला यांनी मुंबईतील मलबार हिल(Malabar Hill) येथे नवीन 13 मजली आलिशान घर(Rakesh Jhunjhunwala house) बांधलं आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बऱ्याच माध्यमांनी त्यांचं हे 13 मजली घरं नक्की कसं आहे? हे देखील सांगितलंय. पण हे घरं बांधण्यासाठी 4 वर्ष राकेश झुनझुनवालांना का थांबायला लागलं होतं? हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर यापाठीमागची गोष्ट जाणून घेऊयात.  

या 13 मजली इमारतीच्या जागी पूर्वी काय होतं?

राकेश झुनझुनवालांनी ज्या ठिकाणी त्यांचं आलिशान 13 मजली घर बांधलंय त्या मलबार हिलच्या(Malabar Hill) प्लॉटमध्ये रिजवे अपार्टमेंट्स(Ridgeway Apartments) नावाची एक छोटी आणि सुंदर इमारत होती. त्यात दोन मोठ्या बहुराष्ट्रीय बँकांच्या मालकीचे 12 अपार्टमेंट होते. या दोन बँकांपैकी एक स्टँडर्ड चार्टर्ड बँक(Standard Chartered Bank) तर दुसरी एचएसबीसी बॅंक(HSBC Bank) होती. या इमारतीमध्ये बँकेचे वरिष्ठ अधिकारी राहत असून या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे उंच छत, छान मांडणी आणि मरीन ड्राईव्हची सुंदर दृश्य असलेली ही सुंदर प्रशस्त अपार्टमेंट त्या भागातील सर्वात कमी दाट इमारतींपैकी एक होती.

म्हणून 4 वर्ष घर बांधण्यासाठी थांबावं लागलं राकेश झुनझुनवालांना

2013 मध्ये अपार्टमेंटची मालकी असलेल्या या दोन बँकांपैकी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने(Standard Chartered Bank) आपला हिस्सा म्हणजे 6 अपार्टमेंट विकण्याचा निर्णय घेतला. विक्री प्रक्रिया पार पाडण्यासाठी तज्ञांनाही आमंत्रित करण्यात आलं. या 6 अपार्टमेंट वैयक्तिकरित्या विकायच्या की सर्रास विकायच्या यावर चर्चा पण झाली. त्यावेळी बँकेने स्पष्टपणे गृहीत धरले की, इमारत ज्या ठिकाणी उभी आहे ती वैयक्तिक अपार्टमेंटपेक्षा जास्त किंमतीची असल्यामुळे सहाही अपार्टमेंट्स एकाच व्यक्तीला विकण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच वेळी अब्जाधीश गुंतवणूकदार असलेले राकेश झुनझुनवाला हे आपलं घर अपग्रेड करण्याचा विचार करत होते. त्यांना फक्त एक किंवा दोन अपार्टमेंट विकत घ्यायच्या नव्हत्या तर त्यांना स्वतःसाठी संपूर्ण इमारतीचा परिसर हवा होता. मग काय संधी चालून आली आणि राकेश झुनझुनवाला यांनी बोली लावून त्या 6 अपार्टमेंट्स 176 कोटी रुपयांना खरेदी केल्या. ही रक्कम किमान राखीव किंमतीपेक्षा 20% इतपत जास्त होती. आता त्यांच्याकडे 6 अपार्टमेंटची मालकी होती तर उर्वरित 6 ची मालकी नव्हती. उर्वरित 6 अपार्टमेंट विक्रीला जाण्याची त्यांना धीराने वाट पाहावी लागली. आणि शेवटी तो दिवस उजाडला.  चार वर्षांनंतर, 2017 मध्ये, HSBC च्या मालकीचे उर्वरित 6 अपार्टमेंट देखील विक्रीसाठी काढण्यात आले. राकेश झुनझुनवाला यांच्याकडून सर्वाधिक बोली लागणार हे त्यावेळी जवळपास निश्चित झालं होतं, त्यामुळे संपूर्ण इमारत त्यांचीच असेल आणि अगदी घडलेही देखील तसेच. झुनझुनवाला यांनी यावेळी 195 कोटी रुपयांची बोली लावून उर्वरित 6 अपार्टमेंटही मिळवल्या. या इमारती पडून त्यांना स्वतःसाठी टुमदार बंगला बांधायचा होता पण हा विचार बदलून त्यांनी 13 मजली इमारत बांधण्याचा निर्णय घेतला, जिथून समुद्राचे भव्य दृश्य(Magnificent view of the Sea) देखील दिसेल. असंख्य घर बांधणीचे नियम, पालिकेचे वेगवेगळे शुल्क भरून शेवटी राकेश झुनझुनवालांनी त्यांच्या स्वप्नातील घरं बांधलचं.