Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property Registration: मालमत्तेची नोंदणी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या जेणेकरून फसवणूक होणार नाही

Property Registration

Image Source : www.magicbricks.com

Property Registration: कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी मालमत्तेची नोंदणी करणे गरजेचे असते मात्र त्यापूर्वीही काही गोष्टी तुम्ही डोळसपणे तपासा.

Property Registration: कोविडच्या महामारी दरम्यान आणि त्यांनतर मोठ्या प्रमाणावर लोकांनी रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक(Real Estate Sector Investment) केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत. जर तुम्हीही घर किंवा जमिनीची खरेदी करणार असाल आणि त्यासाठी नोंदणी(Registration) करणार असाल तर, आजचा हा लेख तुमच्यासाठी आहे. घर किंवा जमिनीची नोंदणी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

जमीन किंवा घराची नोंदणी ही एक कायदेशीर व्यवहार(Legal Transaction) आहे, ज्यामध्ये मालमत्तेचा खरेदीदार मालमत्ता मालकास त्याच्या नावावर करून देतो. या प्रक्रियेत त्या मालमत्तेची कायमस्वरूपी मालकी कायद्यानुसार खरेदीदारास दिली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया करण्यासाठी अनेक कागदपत्रांची गरज असते. विक्रेत्याने नोंदणीच्या(Registration) वेळी सादर केलेली कागदपत्रे बरोबर आहेत का हे तपासून घ्यायला पाहिजेत.

प्रथम मालक शोधा(Find The Owner First)

जमीन विकणारी व्यक्तीच खरी मालक(Owner) आहे, हे तुम्ही नोंदणीपूर्व तपासून घ्यायला हवे. यासाठी तुम्हाला गरज असल्यास तुम्ही वकील(Advocate) किंवा व्यावसायिकांची मदत घेऊ शकता. विक्री डीड आणि मालमत्ता कराच्या पावत्या तपासण्यासाठी तुम्ही वकिलाकडे गेलेले केव्हाही योग्य ठरेल. कायदाच्या चौकटीतून तुम्ही ते सहज तपासू शकता. या आधारे तुम्ही गेल्या 30 वर्षातील मालमत्तेची माहिती गोळा करू शकता.

पब्लिक नोटीस जारी करा(Issue a public notice)

कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी(Property Before Buying) त्या भागातील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये(Local Newspaper) त्या मालमत्तेबद्दल जाहिरात छापून आणा त्याआधारे ती जमीन काही वादात असेल किंवा त्यावर कोणताही दावा चालू असेल तर तुम्हाला खरेदी करण्यापूर्वीच समजेल. त्या जमिनीवर कोणताही तिसऱ्या व्यक्तीचा (Third Party) हक्क आहे का, याची खात्री करूनच नोंदणी करा.

पॉवर ऑफ ॲटर्नी व्हेरिफाय करा(Verify Power of Attorney)

बऱ्याच वेळा जमीन किंवा मालमत्तेची विक्री पॉवर ऑफ ॲटर्नीच्या(POA) माध्यमातून केली जाते. यामध्ये फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. पॉवर ऑफ ॲटर्नीमध्ये नमूद केल्याप्रमाणे तीच मालमत्ता तुम्हाला विकली जात आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्यावसायिकाची मदत नक्की घ्या. या प्रक्रियेत अनेक दस्तऐवजांची देवाणघेवाण केली जाते, जी एक प्रदीर्घ प्रक्रिया असून ती टाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या वतीने ती अधिकृत करू शकलात तर बरे होईल.

नोंदणी करण्यापूर्वी ही कागदपत्रे आवश्य तपासा(Check these documents before registering)

टायटल डीड(Title Deed)

सर्वप्रथम तुम्ही ज्या मालमत्तेची नोंदणी(Property Registration) करणार आहात ती जमीन तुम्हाला विकणाऱ्या व्यक्तीच्याच नावावर आहे का हे तपासण्यासाठी टायटल डीड हे कागदपत्रं तपासा.

एनओसी(NOC)

मालमत्तेसोबत तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळते, ज्यामध्ये असे नमूद केलेले असते की तुमची मालमत्ता इतर कोणत्याही विकासक किंवा बिल्डरशी संबंधित नाही.

कर पावत्यांची पडताळणी(Verification Of Tax Receipts)

मालमत्तेवर कराचा तपशील(Tax Receipts) विचारल्यास सरकारी दस्तऐवजातही मालमत्तेचा उल्लेख असल्याची खात्री करण्यात येते. यामध्ये त्या मालमत्तेवर पूर्वीचा कोणताही कर किंवा रक्कम शिल्लक नाही ना याची खात्री करून घ्या.

कायदेशीर मदत(Legal assistance)

मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज(Bank Verification) घेत असाल, तर कायदेशीर प्रक्रियेच्या दृष्टीने हा सर्वात सोपा मार्ग मनाला जातो, कारण बँक तुम्हाला एखाद्या मालमत्तेवर कर्ज तेव्हाच देते जेव्हा ती पूर्णपणे योग्य व कायदेशीर असते. मालमत्तेच्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये काही कमतरता असल्यास तुमचे कर्ज बँक नाकारेल आणि तुमचीही फसवणूक होण्यापासून तुम्ही वाचाल.