Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp Storage : व्हॉट्सअॅप स्टोरेज भरले आहे? असे रिकामे करा

WhatsApp Storage

व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इन्स्टंट मेसेजिंग अॅपद्वारे आपण जगभरातील कोणाशीही संपर्कात राहू शकतो. पण याद्वारे पाठवण्यात येणारे मेसेज, व्हिडीओ, ऑडिओमुळे स्टोरेज फुल्ल होते. हे स्टोरेज रिकामे कसे करायचे? ते आज पाहूया.

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे एक इन्स्टंट मेसेजिंग अॅप (messaging app) आहे ज्याद्वारे वापरकर्ते ऑडिओ, व्हिडिओ कॉल तसेच संदेशांद्वारे जगभरातील कोणाशीही संपर्कात राहू शकतात. पण अनेक वेळा व्हॉट्सअॅपवर येणारे गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज, मीम्स यांमुळे अॅपचे स्टोरेज फुल्ल होते. बर्‍याच वेळा तुम्ही तुमच्या सेटिंग्जनुसार वाय-फाय किंवा नेटवर्कवर असता तेव्हा व्हॉट्सअॅप (WhatsApp) स्टोरेज भरून जाते आणि डिव्हाइसचे स्टोरेज वापरते. आणि कधीकधी डिव्हाइस स्टोरेज कमी असताना व्हॉट्सअॅप देखील स्लो चालू लागतो. त्यानंतर व्हॉट्सअॅप तुम्हाला स्टोरेज रिकामे करण्यास सांगतो.

फोनमध्ये सेव्ह केलेले व्हिडिओ, फोटो किंवा दस्तऐवज यासारख्या मोठ्या फाइल्स हटवून तुम्ही स्टोरेज मोकळे करू शकता. व्हॉट्सअॅप मध्ये एक बिल्ट-इन टूल आहे, ज्यामुळे तुम्ही किती स्टोरेज वापरत आहे आणि कोणत्या फाइल्स इतका स्टोरेज घेत आहेत हे शोधू शकता. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील व्हॉट्सअॅप स्टोरेज कसे रिकामे करू शकता? ते पाहूया.

असे रिकामे करा स्टोरेज

  • सर्वप्रथम WhatsApp वर जा आणि चॅट्स टॅबवर टॅप करा. त्यानंतर मोअर ऑप्शन्सवर जाऊन सेटिंगमध्ये नेव्हिगेट करा.
  • त्यानंतर स्टोरेज आणि डेटावर टॅप करा आणि मॅनेज स्टोरेज पर्यायावर जा.
  • आता सगळ्यात वर, तुम्हाला अनेकवेळा फॉरवर्ड केलेले मेसेज दिसतील. यानंतर तुम्हाला 5 एमबीपेक्षा मोठ्या फाईलचा पर्याय दिसेल.
  • आता तुमच्या गरजेच्या विभागात जाऊन तुम्ही एक-एक करून कोणताही फाईल पर्याय निवडू शकता किंवा एकत्र निवडून ती हटवू शकता.
  • आता डिलीट करण्‍यासाठी, तुम्‍हाला सर्वात आधी डिलीट करायचे असलेले आयटम निवडा. आणि नंतर अॅपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणार्‍या डिलीट आयकॉनवर टॅप करा.
  • याशिवाय सर्च फीचरचा वापर करून तुम्ही चॅटमधून आयटम डिलीट करु शकता. हे करण्यासाठी, चॅट विभागात जा आणि नंतर फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंटवर टॅप करा. आता तुम्हाला डिलीट करायचा असलेला आयटम शोधा आणि More वर टॅप करा. आणि नंतर डिलीट बटणावर टॅप करा.