Whatsapp New Features: Whatsapp हे एक लोकप्रिय अॅप असून मोठया प्रमाणात या अॅपचा वापर केला जातो. या अॅपमुळे लोक व्हर्च्युअल अगदी एकमेकांच्या जवळ आली आहेत. मॅसेज असो या व्हिडीओ काॅल व्हाॅटसअॅप नेहमीच युजर्सच्या लिस्टमध्ये नंबर वन राहिले आहे. युजर्सच्या या लोकप्रिय अॅपमध्ये आता एक नवीन फीचर आले आहे. या फीचर्सबाबत अधिक जाणून घेवुयात.
काय आहेत नवीन फीचर्स (Whatsapp New Features)
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. या अॅपने युजर्ससाठी नवीन शॉर्टकट आणले आहेत. याचा मोठा फायदा अॅडमिन्सला होणार आहे. हा शॉर्टकटचे अपडेट Meta ने Apple App Store वर लेटेस्ट 23.1.75 दिले आहे. या शॉर्टकटने अॅडमिन्सला ग्रुप हॅडेल करणे अधिक सोपे होणार आहे. या शॉर्टकटमुळे संपर्काशी संबंधित अनेक पर्याय देण्यात आले आहेत आणि विविध अॅक्शन्स परफॉर्मदेखील घेता येणार आहे. अॅडमिन कॉल करण्यापासून ते वैयक्तिक मेसेजिंगपर्यंत सर्व काही करू शकणार आहेत.
नवीन WhatsApp शॉर्टकट कसे वापरायचे
आता एखाद्या मेंबरने जर ग्रुप सोडला असेल, तर त्याचा नंबर हायलाइट होणार आहे. नवीन अपडेटसह, Group Admins ला कॉल करण्यासाठी संपर्काच्या नंबरवर दीर्घकाळ टॅप करणे गरजेचे आहे. याशिवाय, अॅडमिन्स कोणत्याही ग्रुपमध्ये असणाऱ्या युजर्ससोबत प्रायव्हेट चॅटिंग करू शकणार असल्याची माहिती WABetaInfo या व्हॉट्सअॅप अपडेट्सची माहिती देणार्या प्लॅटफॉर्मव्दारे सांगण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये नवीन युजर्स जोडणे झाले सोपे
मेसेजिंग अॅपच्या iOS व्हर्जनमधील इतर शॉर्टकटबद्दल सांगायचे तर, कोणत्याही ग्रुपमधील युजर्सचा मोबाईल नंबर आता सहजपणे कॉपी करता येणार आहे. याव्यतिरिक्त, अॅड्रेस बुकमधून नवीन युजर्सला अॅपचा भाग बनवणे देखील पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. iOS युजर्स फक्त नवीन फीचर वापरू शकतात. आयफोन युजर्सना त्यांचे अॅप लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करावे लागणार आहे. लवकरच हे फीचर सर्व यूजर्सलादेखील वापरता येणार आहे.