Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ATM मधून पैसे निघाले नाही पण खात्यातून डेबिट झाले, तर काय करावं?

bank ATM

ATM Transaction: अनेकदा व्यवहार अयशस्वी होऊनही खात्यातून पैसे कापले जातात. तुमच्यासोबतही असे घडले असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

ATM Transaction: एटीएममुळे(ATM) आपले जीवन सुकर झाले आहे यात शंका नाही. काही मिनिटांत एटीएममधून रोख रक्कम सहज काढली जाते, पण काही वेळा हेच एटीएम आपल्याला अडचणीत आणते. डेबिट कार्डने(Debit Card) एटीएममधून पैसे काढताना मशीनमधून रोकड बाहेर येत नाही पण खातेधारकाच्या खात्यातून पैसे कापले जातात, असे अनेकदा लोकांसोबत घडले आहे. कधीकधी नेटवर्क किंवा कधी इतर कारणांमुळे व्यवहार अयशस्वी होतो तर अनेकदा व्यवहार अयशस्वी होऊनही खात्यातील पैसे कापले जातात. तुमच्यासोबतही असे घडले असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. तुमचा व्यवहार अयशस्वी झाल्यानंतरही तुमच्या खात्यातून पैसे कापले जात असतील, तर तुम्ही ज्या बँकेचे खातेधारक आहात त्या बँकेकडे तक्रार करा. तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून याबाबत तक्रार नोंदवू  शकता. काही वेळा एटीएममध्येही पैसे अडकतात. जर तुमचे पैसे एटीएममध्ये अडकले असतील, तर बँका हे पैसे 12 ते 15 दिवसांत परत करते.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • एटीएममधून पैसे काढण्याच्या वेळी व्यवहार पूर्ण झाला नाही तर त्वरित पैसे काढण्याचे नोटिफिकेशन(notification) तपासून घ्या 
  • तुम्ही तुमच्या बँकेत जमा केलेल्या रकमेची माहिती ताबडतोब मिळवा आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले आहेत का? याची खात्री करून घ्या 
  • एटीएममधून पैसे न काढता खातेधारकाच्या खात्यातून पैसे कापले गेले तर 5 दिवस रिफंडची वाट पाहा, बँक पाच दिवसांत पैसे खात्यात परत जमा करते 
  • पाच दिवसांनंतरही खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर तुम्ही बँकेच्या शाखेत व्यवहार अयशस्वी झाल्याची तक्रार करू शकता
  • बँकेकडे तक्रार केल्यानंतर 30 दिवसांपर्यंत खातेधारकाच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर तुम्ही तक्रार निवारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता

ऑनलाईन तक्रार करू शकता?

  • जर आरबीआयने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही पैसे परत केले नाहीत तर, विद्यमान ग्राहक / अंतर्गत https://crcf.sbi.co.in/ccf/ under Existing Customer //ATM related//ATM related//Account Debited but cash not dispensed श्रेणीवर जाऊन तक्रार करू शकता
  • खातेधारक एसबीआय हेल्पलाइन नंबर 1800 11 2211(टोल-फ्री), 1800 425 3800(टोल-फ्री) वर कॉल करून तक्रार करू शकतात 
  • सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत 080-26599990 या क्रमांकावर फोन करूनही तक्रार नोंदवू शकता

नुकसान भरपाईची तरतूद काय?

जर बँकेने तुमच्या खात्यातून डेबिट केलेली रक्कम निर्धारित वेळेत परत केली नाही, तर बँकिंग नियमात नुकसान भरपाईची तरतूद आहे. रिझर्व्ह बँकांच्या (आरबीआय) नियमांनुसार बँकेला 5 दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करावे लागते. या कालावधीत बँकेने तडजोड न केल्यास, त्यानंतर प्रतिदिन 100 रुपये या दराने भरपाई द्यावी लागेल. तरीही तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही https://cms.rbi.org.in वर तक्रार नोंदवू शकता.