Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

काय आहे तुमची इन्व्हेस्टमेंट पर्सनॅलिटी?

काय आहे तुमची इन्व्हेस्टमेंट पर्सनॅलिटी?

तुमच्या गुंतवणुकीवरुन तुमचे व्यक्तिमत्व झळकते? चला गुंतवणुकीमधून अशाच काही व्यक्तीमत्त्वांची माहिती जाणून घेऊया

तुमचा स्वभाव कसा आहे! हे तुम्हाला समजल्यावर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणून ती गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवता येते. 

तुमचा विश्वास असो  किंवा नसो, तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करतो. एका संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, आपल्या समजुती, अनुभव, संगोपन आणि वातावरण हे आपल्या शिक्षणापेक्षा आपली गुंतवणूक करण्याची प्राथमिकता  अधिक प्रतिबिंबित करतात. अर्थात, हे एक सामान्य विधान आहे आणि प्रत्येक नियमाला अपवाद असतातच. चला असे काही वेगवेगळे प्रॉडक्टस् उत्पादने खरेदी करण्याची अधिक शक्यता असलेल्या लोकांचे प्रकार पाहू या.

फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट्स : 

फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट्समध्ये बँक डिपॉझिट्स, PPF, बॉण्ड्स, पोस्टाची बचत योजना इत्यादींचा समावेश आहे. या उत्पादनांमधील गुंतवणूकदार मुख्यत: सेफ़्टी चा विचार करतात. ते थोडे जुन्या विचारांचे असतात. दीर्घकालीन विचार करतात. फारच कमी रिस्क घेतात आणि कमी व्याजात समाधानी असतात.     

सोन्यात गुंतवणूक करणारे : 

हे गुंतवणूकदार स्वभावाने साठेबाजी करणारे असतात. जोखीम टाळणे पसंत करतात आणि ते नेहमी थोडे हातचे राखून असतात. मालमत्ता म्हणून सोन्याची किंमत गेल्या 15 वर्षात पाच पट वाढली आहे. पण भविष्यात असाच भाव मिळेल का? हे मात्र अनिश्चित आहे. या कॅटेगरीतील गुंतवणूकदारांना पिवळ्या धातूच्या पलीकडे मात्र कोणतीच गुंतवणूक फायदेशीर वाटत नाही.     

रिअल इस्टेट गुंतवणूकदार : 

असे ग्राहक दीर्घकालीन  गुंतवणूकदार, भाडेकरु आणि त्यांच्याद्वारे मिळणारे उत्पन्न शोधणारे, कौतुक आवडणारे आणि भौतिक गोष्टींवर विश्वास ठेवणारे असतात. गंमत म्हणजे अशा गुंतवणुकदारांची अगदी उलट कॅटेगरीदेखील आहे. ही कॅटेगरी रिअल इस्टेटला स्टॉक फ्लिप करण्यापेक्षा वेगाने फ्लिप करते.  नवीन लाँचमधून फायदा घेताना ते मोठी रिस्कही घेतात. पूर्वी  प्रॉपर्टीतल्या तेजीमुळे या दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकदारांना लक्षणीय फायदा झाला होता. पण सध्याच्या काळात प्रॉपर्टीचा किंवा रिअल इस्टेट इंडस्ट्रीचा भाव वाढण्याचा कालावधी खूपच वाढलेला आहे. त्यामुळे सध्यारिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं हे तोट्याचं ठरु शकतं.

फंड गुंतवणूकदार : 

अशा प्रकारचे गुंतवणूकदार एकतर दीर्घकालीन (लॉंग टर्म) गुंतवणूकदार असतात आणि काही जण शेअर लॉंग टर्मसाठी घेऊन ठेवतात. तर काही गुंतवणूकदार फक्त कमी काळासाठी गुंतवणूक करणं पसंत करतात. रिस्क स्वीकारून ते एकप्रकारे जुगार खेळायला ही तयार असतात. यांच्यापैकी काही सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान म्हणजेच SIP द्वारे गुंतवणूक करत असतील तर त्यांच्यात आर्थिक शिस्त असू शकते. एकंदरीत, त्यांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे माहित असतात आणि ते नेहमी योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात.     

इक्विटीज : 

तुम्ही सक्रिय गुंतवणूकदार आहात. तुम्हाला मल्टीटास्किंग आवडते. साहसी वृत्ती म्हणजे थोडे निडर असलेल्या गंतवणुकदारांचा सट्टेबाजीकडे जास्त कल असू शकतो. अशा व्यक्ती शेअर मार्केट, त्याच्याशी संबंधित बातम्या आणि कंपन्यांचा जमा-खर्च, त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी बराच वेळ देतात. असे लोक रिस्क घेण्यास अजिबात घाबरत नाहीत; जास्त पैसे मिळवण्यासाठी ते कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात. असे लोक आशावादी देखील असतात. ते नेहमी बाजार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालावा अशी त्यांची इच्छा असते.   

तुमच्यातला गुंतवणूकदार  तुमचे व्यक्तीमत्त्व ठरवत असतो. आपला अचूक स्वभाव जाणून घेतल्यानंतर गुंतवणूक करणे आणि त्यातील रिस्क जाणीवपूर्वक कमी करणे शक्य असते. आता तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात?