Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Trend: शेअर मार्केटमध्ये ट्रेंड कसा ओळखायचा?

Share Market Trend

Share Market Trend: शेअर मार्केट मध्ये ट्रेंड न समजता काम करणे, अतिशय जोखमीचे काम आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी सोप्या भाषेत यासंदर्भातील माहिती घेऊन आलो आहोत.

Share Market Trend: हल्ली सगळ्यानांच शेअर मार्केट(Share Market) मध्ये गुंतवणूक(Investment) करून भरपूर पैसे मिळवायचे आहेत. पण बऱ्याच जणांना यासंदर्भात सविस्तर माहिती नाहीये. बरेच जण यासंदर्भात थोडे थोडके ज्ञान मिळवतात खरे पण त्यांना शेअर मार्केटमधील ट्रेंड(Share Market Trend) कसा ओळखायचा? हे समजत नाही. शेअर मार्केट मध्ये ट्रेंड न समजता काम करणे, अतिशय जोखमीचे काम आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी सोप्या भाषेत यासंदर्भातील माहिती घेऊन आलो आहोत. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

गुंतवणूक(Investment) आणि ट्रेडिंग(Trending) करण्यासाठी योग्य ट्रेड निवडणे गरजेचे आहे. ट्रेंड न समजता बाजारात काम करणे म्हणजे जुगार खेळण्यासारखा आहे. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी योग्य ट्रेंड घेणे गरजेचे आहे. आजच्या या लेखामध्ये आपण शेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखायचा – How to identify trend in stock market याबद्दल माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत.

शेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखायचा?

शेअर बाजारात ट्रेंड(Share Market Trend) ओळखणे ही नवीन ट्रेडर्सकरिता पहिली पायरी आहे. ही गोष्ट समजून घेण्याकरिता सगळ्यात पहिल्यांदा ट्रेंड म्हणजे काय? हे समजून घेणे गरजेचे आहे. ट्रेंड म्हणजे शेअर मार्केटची चालू असलेली दिशा किंवा मार्केटची कोणत्या दिशेने हालचाल होणार आहे याबद्दलची माहिती. ही दिशा शेअर मार्केटमधील शेअर्सच्या खरेदी आणि विक्री किंमत यावरून ठरत असते.

ट्रेंडचे किती प्रकार आहेत

Uptrend (तेजी)

शेअर मार्केटमध्ये स्टॉक पुरवठ्यापेक्षा(supply) मागणी(demand) अधिक असल्याने तेजी येत असते. तेजीच्या ट्रेंड मध्ये कँडलस्टिक पॅटर्न higher high आणि higher low बनवत असतो, आणि चार्टमध्ये वरच्या बाजूला जाताना पाहायला मिळतो.  यावरून तुम्ही मार्केटमधील तेजी ओळखू शकता. यावेळी मार्केटमध्ये खरेदी करण्याचा सिग्नल मिळतो. अश्या वेळेस योग्य ट्रेड निवडला तर नक्कीच फायदा होतो.

Downtrend (मंदी)

शेअर मार्केटमध्ये स्टॉक पुरवठा (supply) जास्त असतो, आणि मागणी (demand) कमी असल्यामुळे मंदी येत असते. मंदी ट्रेंड मध्ये कँडलस्टिक पॅटर्न lower high आणि lower low बनवत असतो, आणि चार्टमध्ये कँडल खालच्या बाजूला जाताना पाहायला मिळतो. यावरून तुम्ही बाजारातील मंदी ओळखू शकता. यावेळी बाजारात विक्री करण्याचा सिग्नल मिळतो. अश्या वेळेस योग्य ट्रेड निवडला तर फायदा निश्चितच होतो.

Sideways (एकच ठिकाणी ट्रेड करणे)

शेअर मार्केटमध्ये स्टॉक पुरवठा (supply) आणि मागणी (demand) एकसमान असल्याने हा ट्रेंड निर्माण होत असतो. हा ट्रेंड ओळखताना लक्षात ठेवा की चार्टमध्ये एका ठराविक रेंज मध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असतो. यावरून तुम्ही बाजारातील Sideways trend ओळखू शकता. यावेळी बाजारात विक्री किंवा खरेदी करू नये. अशा वेळेस शक्यतो शेअर बाजारात प्रवेश करणे टाळणे केव्हाही चांगले.

शेअर मार्केटमधील ट्रेंड ओळखण्याची पद्धत

  • शेअर मार्केटमधील ट्रेंड ओळखण्यासाठी तुम्ही स्टॉक ब्रोकरचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरू शकता. या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला काही टेक्निकल इंडिकेटर उपलब्ध करून दिले जात आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही trading view देखील वापरू शकता
  • पहिल्या पद्धतीमध्ये टेक्निकल इंडिकेटर वापरून तर दुसरी पद्धत कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास करून वापरली जाते
  • टेक्निकल इंडिकेटरमध्ये MACD आणि सुपर ट्रेंड हे दोन इंडिकेटर शेअर मार्केटमध्ये  ट्रेंड ओळखण्यास मदत करतात
  • कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये सपोर्ट आणि रेसिस्टॅन्सच्या मदतीने ट्रेंड ओळखता येतो
  • चार्टमध्ये कॅन्डलस्टिक higher resistance आणि higher support बनवत वरच्या बाजूला जात असेल, तर शेयर मार्केट मध्ये तेजी (uptrend) असते
  • चार्टमध्ये कॅन्डलस्टिक lower resistance आणि lower support बनवत खालच्या बाजूला जात असेल, तर शेयर मार्केट मध्ये मंदी(downtrend) आहे
  • sideways trend हा ट्रेड ओळखता येत नाही