मेटा, ट्विटरपाठोपाठ आता वॉल्ट डिस्नेनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तिमाहीतील तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, वॉल्ट डिस्ने कंपनी (डी.आय.एस. एन) शुक्रवारी डिस्ने + स्ट्रीमिंग सेवा आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर नफ्याकडे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याने नोकरभरती न करण्याचा आणि काही नोकऱ्या कमी करण्याचा विचार करीत आहे.
Table of contents [Show]
...म्हणून नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय (The decision to cut jobs)
डिस्नेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब चापेक यांनी डिस्नेच्या प्रमुख कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे की, “खर्चाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्दिष्टाने निश्चित नोकरभरती न करण्याचा आणि काही नोकऱ्या कमी करण्याचा विचार करीत आहे.” ते पुढे म्हणाले की, “काही मायक्रोइकॉनॉमिक घटक आपल्या नियंत्रणाबाहेर गेले असले, तरीही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो विशेषतः खर्च त्या व्यवस्थापित करण्यासाठी आपली भूमिका बजावत राहणे आवश्यक आहे.”
स्ट्रिमींग व्हिडीओमध्ये तोटा (Loss in Streaming Video)
मंगळवारी डिस्नेने वॉल स्ट्रिटचा तिमाही कमाईचा अंदाज चुकल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. कारण मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनीने ज्याला तो डायरेक्ट-टू-कन्झ्युमर (डीटीसी) व्यवसाय म्हणून संबोधतो अशा स्ट्रिमिंग व्हिडीओमध्ये अधिक तोटा सहन केला आहे. ज्यामुळे बुधवारी कंपनीचे शेअर्स 13% पेक्षा जास्त घसरले.
वर्ष 2024 फायदेशीर ठरेल (The year 2024 will be profitable for Disney)
डिस्नेने म्हटले आहे की, वेगाने वाढणाऱ्या या सेवेने आपल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहिमध्ये 12 दशलक्ष ग्राहकांची भर घातली आहे. परंतु सुमारे 1.5 अब्ज डॉलर्सचा ऑपरेटिंग तोट्याची नोंद केली आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की, तिमाहीत तोटा वाढला असला तरी डिस्ने + आर्थिक वर्ष 2024 मध्ये फायदेशीर ठरेल.
व्हर्च्युअल सहली आयोजित करणार (Disney Will organize virtual business trips)
वॉलस्ट्रीटच्या विश्लेषकांनी डिस्नेच्या वाढत्या स्ट्रिमींग खर्चाबाबत चिंता व्यक्त केली आहे. मॉफेट नॅथनसनचे विश्लेषक मायकेल नॅथनसन यांनी या आठवड्यात एका नोटमध्ये असे नमूद केले आहे की, “कंपनीला हे सिद्ध करावे लागेल की डीटीसीमध्ये त्यांचे प्रमुख काम सध्या दिले जात असलेल्या गुंतवणूकीच्या किंमतीसाठी योग्य असेल.” कर्मचारी कपातीसह इतर खर्च वाढवण्याकडेही कंपनीचा कल असल्याचे चापेक यांनी म्हटले आहे. परिणामी व्यावसायिक सहलींवर मर्यादा आणण्यात येईल. कोणत्याही व्यावसायिक सहलीसाठी पूर्व परवानगीची आवश्यकता गरजेचे असल्याचे किंवा जास्तीत जास्त व्हर्च्युअल सहली आयोजित करण्याचा निर्णय घेतला जाईल.