Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Layoff : Elon Musk यांचा धडाका, हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवले

Elon Musk, Twitter Lay Off, Twitter Blue Tick

Image Source : Photo credit/Twitter: elonmusk

Twitter Layoff : ट्विटरने कर्मचाऱ्यांसाठी एक ईमेल पाठवला आहे.त्यात म्हटले आहे की, "तुम्ही जर कार्यालयात येण्यासाठी निघाला असाल किंवा कार्यालयाच्या रस्त्यात असाल तर घरी माघारी जा, या मेलने कर्मचाऱ्यांची झोप उडवली आहे.

इलॉन मस्कने (worlds richest person Elon Musk) ट्विटरचा ताबा घेताच कठोर धोरणांचा अवलंब आहे. त्यांनी 44 बिलियन अमेरिकन डॉलर मध्ये ट्विटरची खरेदी केली. खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इलॉन मस्क ट्विटरमधील निम्म्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करणार आहेत. ट्विटरमधील कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होमचे स्वातंत्र्य देखील काढून टाकण्याचा निर्णय ट्विटरकडून घेण्याची शक्यता आहे. तसे संकेत देणारे ट्विट इलॉन मस्क यांनी केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे.

कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार

ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेताच सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. आता या कंपनीतील निम्म्या कर्मचाऱ्यांवर कामावरून कमी करण्याची टांगती तलवार आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, ते आज, 4 नोव्हेंबरला ट्विटरच्या 3700 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत. कंपनीच्या 7,500 कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण जवळपास 50 टक्के आहे.  

ई-मेलमध्ये काय आहे?

ट्विटरने कर्मचाऱ्यांसाठी एक ईमेल पाठवला आहे.त्यात म्हटले आहे की,  "तुम्ही जर कार्यालयात येण्यासाठी निघाला असाल किंवा कार्यालयाच्या रस्त्यात असाल तर घरी माघारी जा. " पुढे म्हटले आहे की, "ज्यांना कामावरून काढण्यात येईल येईल त्यांना तशी सूचना त्यांच्या पर्सनल ईमेल आयडीवर कळवण्यात येईल." असा आशयाचा मेल पाठवला आहे.

कर्मचाऱ्यांना मिळतो एवढा पगार

ट्विटर मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक सरासरी 22.1 लाख पगार देण्यात येतो. तर सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअरचे वार्षिक पॅकेज 58.6 लाख रुपये देण्यात येते. 

ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय

ब्लूमबर्गने आपल्या वृत्तात ट्विटर मोठ्या प्रमाणात कामाचा लोड कमी करण्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप या दाव्याला ट्विटरने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. ट्विटरचा ताबा घेताच मस्क यांनी कंपनीमध्ये धोरणात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ट्विटरवर ब्लू टिक साठी खातेदारकाकडून शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीच्या अधिग्रहणानंतर पहिला मोठा धोरण बदल म्हणून, मस्क प्रत्येक ब्लू टिक खातेधारकाकडून शुल्क आकारणार आहेत. या करारानंतर ट्विटरचा मालक झालेल्या मस्क यांनी ट्विरवरील ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी 8 डॉलर (सुमारे 660 रुपये) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. इलॉन मस्क यांनी काल आपल्या एका ट्विटमध्ये सांगितले की, ट्विटर हे इंटरनेटवरील सर्वात मनोरंजक ठिकाण आहे. दरम्यान, इलॉन मस्क यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.