Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vedanta-dividend : वेदांता शेअरवर लक्ष ठेऊन असाल तर तुमच्यासाठी खुषखबर !

VEDL

Image Source : www.manufacturingtodayindia.com

VEDLने त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्यासाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शेअर बाजारात सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

खाण कंपनी वेदांता लिमिटेड,( VEDL) ने त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्यासाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. कंपनीने एक्स्चेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, 27 जानेवारी, शुक्रवार, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी चौथ्या अंतरिम लाभांशाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी बोर्डाची बैठक होणार आहे. कंपनीने केलेल्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, वेदांत बोर्डाने मंजूरी दिल्यास लाभांश रकमेच्या देयकासाठी भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 4 फेब्रुवारी, शनिवार ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

कंपनीचे संचालक मंडळ (बोर्ड) शुक्रवार 27 जानेवारी 2023 रोजी, आर्थिक वर्ष 2022-23 साठी इक्विटी शेअर्सवरील चौथ्या अंतरिम लाभांशाचा विचार करेल आणि मंजूर करेल,". असे सांगण्यात आले आहे.  लाभांश हा कॉर्पोरेट समभागांपैकी एक आहे. स्टॉक डिव्हिडंड ही एक रक्कम आहे जी एखाद्या सूचीबद्ध कंपनीद्वारे भागधारकांना रोख स्वरूपात दिली जाते. स्टॉक डिव्हिडंड मुळात कंपनीची रोख शिल्लक कमी न करता भागधारकांना पुरस्कृत करतो.

VEDLची आजची शेअर प्राइज 

बोर्ड 27 जानेवारी रोजी तिसऱ्या तिमाहीसाठी अनऑडिटेड स्टँडअलोन आणि एकत्रित आर्थिक निकालांचा देखील विचार देखिल करणार आहे. बुधवारी 25 जानेवारी रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज वर  (NSE) वेदांताचा शेअर लाल चिन्हासह ट्रेड केला जात आहे. बुधवारी बाजाराच्या मध्यंतराच्या सुमारास हा शेअर 327 रुपयांवर ट्रेड करत होता. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी 2.65 रुपयांची म्हणजेच 0.80 टक्क्यांची घसरण बघायला मिळाली. गेल्या 6 महिन्यांत, वेदांताच्या समभागांनी गुंतवणूकदारांना सुमारे 25 टक्क्याहून अधिक परतावा दिला आहे.  सध्याच्या पातळीवर कंपनीचे मार्केट कॅप 1.22 लाख कोटी रुपये आहे.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)