Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp Storage Issue: तुम्हीही व्हॉटसअ‍ॅप स्टोरेज कमी करण्यासाठी वापरा 'या' सोप्या स्टेप्स

WhatsApp Storage Issue

WhatsApp Storage Issue: हल्ली व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज लगेच भरू लागण्याने नव्या मीडिया फाईल्स किंवा इतर कोणताही कंटेन्ट शेअर करणे किंवा डाऊनलोड करणे कठीण होते. अशावेळी व्हॉटसअ‍ॅप स्टोरेज कसे कमी करता येईल याचा पर्याय आपण शोधत असतो. तो जाणून घेण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.

WhatsApp Storage Issue: सध्याचा लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉटसअ‍ॅपचा(WhatsApp) मोठ्या प्रमाणावर लोक वापर करत आहेत. सतत टेक्स्ट, मीडिया किंवा इतर फाईइल्स शेअर करण्यासाठी व्हॉटसअ‍ॅप वापरले जाते. हल्ली व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज(WhatsApp Storage Issue) लगेच भरू लागण्याने नव्या मीडिया फाईल्स किंवा इतर कोणताही कंटेन्ट शेअर करणे किंवा डाऊनलोड करणे कठीण होते. अशावेळी व्हॉटसअ‍ॅप स्टोरेज कसे कमी करता येईल याचा पर्याय आपण शोधत असतो. आयफोनवर(iphone) व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज कमी करण्यासाठी कोणत्या स्टेप्स वापराव्या हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

अशा प्रकारे आयफोनवर WhatsApp स्टोरेज तपासा

  • आयफोनमधील Settings हा पर्याय उघडा
  • त्यामध्ये General पर्याय निवडा
  • त्यानंतर आयफोन स्टोरेज पर्यायामध्ये व्हॉटसअ‍ॅप(WhatsApp) हा पर्याय निवडा

WhatsApp स्टोरेज कमी करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • व्हॉटसअ‍ॅपमध्ये Settings हा पर्याय निवडा
  • त्यानंतर ‘Storage and Data’ हा पर्याय निवडा
  • त्यामधील 'Manage Storage' या पर्यायावर क्लिक करा
  • त्यामध्ये तुम्हाला पुर्ण व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज पाहायला मिळेल. त्यातील अनावश्यक मीडिया फाईल्स डिलीट करा
  • 5 MB पेक्षा जास्त मोठ्या फाईल्स निवडा आणि त्या डिलीट करा.
  • याशिवाय ‘Forwarded Many Times’ अशा मीडिया फाईल्स देखील तुम्ही डिलीट करू शकता, याचा पर्यायही मॅनेज स्टोरेजमध्ये देण्यात आलेला असतो