Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp New Feature: जाणून घ्या, आता इंटरनेट नसतानाही व्हॉट्सअॅप येणार वापरता

WhatsApp New Feature

WhatsApp Update: आता, तुम्हाला मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानादेखील तुम्हाला व्हॉट्सअॅपने चॅट करता येणार आहे. कारण व्हॉट्सअॅपने आता नवीन फीचर आणले आहे. या फिचरचे नाव आहे, 'प्रॉक्झी सपोर्ट फॉर व्हॉट्सअॅप.' या फिचरविषयी अधिक जाणून घेऊयात.

WhatsApp New Feature Update: व्हॉट्सअॅप हे कोणाला आवडत नाही. या अॅपमुळे फोनवर संवाद साधणे अगदी सोपे झाले आहे. जगातील करोडो लोकं या अॅपचा वापर करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅपदेखील युजर्सला आकर्षित करण्यासाठी नवनवीन फीचर आणत आहे. नुकतेच व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे, या फीचरविषयी सविस्तर जाणून घेऊयात.  

नवीन फीचरचे नाव (The Name of the New Feature)

नवीन वर्षात व्हॉट्सअॅप अनेक फीचर घेऊन येण्याच्या तयारीत आहे. नुकतेच व्हॉट्सअॅपचे ‘अवतार’ (Avtar) हे नवीन फीचर येणार असल्याची बातमीदेखील आली आहे. तत्पूर्वी व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरचे नाव आहे, ‘प्रॉक्झी सपोर्ट फॉर व्हॉट्सअप’ (Proxy Support for WhatsApp). हे फीचर तुम्हाला मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन नसताना ही वापरताना येणार आहे.

काय असणार सुविधा (What will be the Facility)

हे व्हॉट्सअपचे नवीन फीचर 5 जानेवारीला लॉंच करण्यात आले आहे. यामध्ये इंटरनेट नसताना ही व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. यामध्ये जसे की, इंटरनेट रिचार्ज नसले, तरी तुम्हाला व्हॉट्सअॅपने मेसेजेस् पाठवता येणे शक्य होणार आहे. एवढचं नाही तर विना इंटरनेटदेखील तुम्हाला मेसेज रिसीव्ह देखील होणार आहे. सोप्या व सहज शब्दात सांगायचे झाले, तर आता विना इंटरनेट तुम्हाला व्हॉट्सअप चॅट करता येणे शक्य होणार आहे.

पूर्वीचे व्हॉट्सअॅप (Earlier WhatsApp)

इंटरनेट विना व्हॉट्स अपचा वापर करणे हे अशक्यच आहे. साधारण 14 वर्षापूर्वी व्हॉट्सअप मार्केटमध्ये आले होते. तेव्हापासून आजतगायत विना इंटरनेट व्हॉट्सअप कधीच चालले नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे व्हॉट्सअप वापरण्यास इंटरनेट असणे अनिवार्य आहे. मॅसेज करणे, फोटो पाठविणे, व्हिडीओ पाठविणे, कागदपत्रे पाठविणे अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअपवरून एकमेकांना शेयर होतात, मात्र यासाठी इंटरनेट असणे गरजेचे होते. मात्र ही समस्यादेखील दूर होणार आहे. व्हॉट्सअपचे नवीन फीचर ‘प्रॉक्झी सपोर्ट फॉर व्हॉट्सअप’ हे फीचर तुमचे काम सोपे करणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नसले, तरी हरकत नाही. या नवीन फीचरव्दारे तुम्ही व्हॉट्सअपवर चॅट करू शकता.