Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन 5 भन्नाट फीचर्स तुम्हाला माहिती असायलाच हवेत, जाणून घ्या सविस्तरपणे

WhatsApp Update

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी हे 5 फीचर्स रोलआउट करण्याआदी कंपनी बीटा व्हर्जनमध्ये(Beta Version) त्याचे टेस्टिंग करत आहे. त्यामुळे टेस्टर्स कडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेनुसार फिचर्समध्ये बदल केले जातील आणि त्यानंतरच वापरकर्त्यांसाठी हे फीचर्स खुले केले जाणार आहेत.

WhatsApp New 5 Features: सोशल मीडियातील प्रसिद्ध लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून व्हॉट्सअ‍ॅपचा(WhatsApp) वापर ग्राहक करत असतात. आपल्या ग्राहकांना सर्वात चांगली सेवा मिळावी यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणले जातात. त्यामुळेच दिवसेंदिवस हे माध्यम अधिक सुधारित आणि प्रचलित होत चालले आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपने 5 नवीन फीचर्स आणले आहेत. वापरकर्त्यांसाठी हे फीचर्स रोलआउट करण्याआदी कंपनी बीटा व्हर्जनमध्ये(Beta Version) त्याचे टेस्टिंग करत आहे.  त्यामुळे टेस्टर्सकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेनुसार फिचर्समध्ये बदल केले जातील आणि त्यानंतरच वापरकर्त्यांसाठी हे फीचर्स खुले केले जाणार आहेत. पण हे फीचर्स कोणते असणार आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.

चॅट विथ युवरसेल्फ(Chat with Yourself)

व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp) लवकरच वापरकर्त्याला स्वतःसोबत चॅट(Yourself) करण्याचा अनोखा पर्याय देणार आहे.यामुळे लिंक्स, नोट्स, मीडिया फाइल्स सेव्ह करणं अधिक सोपं होणार आहे. त्यामध्ये वापरकर्त्यांना इतर चॅट विंडोज सारखी ही विंडो दिसेल. यामध्ये मेसेज किंवा नोट्स सहज सेव्ह करता येणार आहे.

फॉरवर्ड मीडिया विथ कॅप्शन(Forward media with captions)

व्हॉट्सअ‍ॅपवर(WhatsApp) जर तुम्ही एखाद्या फोटोला कॅपशन(Caption) देऊन सेंड केलं तर ती इमेज फॉरवर्ड(Forward) करताना त्यासोबत कॅप्शन पाठवला जात नाही. हा वापरकर्त्यांच्या त्रास लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅपने त्यामध्ये बदल केले आहेत. हे फीचरसुध्दा सध्या टेस्टिंगनंतर रोलआउट होईल.

ब्लर टूल फॉर इमेजेस(Blur tool for images)

आपण बऱ्याच वेळा इतरांना फोटो पाठवत असतो. अशा वेळी त्यातील काही भाग ब्लर करण्याची सोय देखील व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp) आता देणार आहे. याकरिता नव्या ब्लर टूल फॉर इमेजेसची(Blur tool for images) मदत होणार आहे. या टूलमुळे तुम्हाला समोरच्याला जे दिसू नये असं वाटत असेल ते तुम्ही ब्लर करू सहकार आहेत. हा पर्याय वापरकर्त्यांना फोटो सेंड करण्याआधी एडिटींगमध्ये करता येणार आहेत.

मीडिया ऑटो-डाउनलोड फॉर डेस्कटॉप(Media auto-download for desktop)

डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp) वापरणाऱ्यांना मीडिया ऑटो डाउनलोडचा ऑप्शन यापुढे मिळणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना ऑटो डाउनलोड थांबवून हवे तेवढेच डाउनलोड(Download) करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या हे फीचर फक्त मोबाइलमध्ये उपलब्ध आहे. मात्र यापुढे ते डेस्कटॉपवरही(Desktop) मिळणार आहे.

प्रोफाईल फोटोज इन ग्रुप चॅट्स(Profile photos in group chats)

व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp) ग्रुप्समध्ये खूप लोक असल्याने कोण कोणाला मॅसेज करते हे समजणं थोडं अवघड होतं. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने या नव्या फीचरमध्ये मेसेज सोबत पाठवणाऱ्याचा फोटोही(Photo) दिसण्याची सोया केली आहे. हे फीचर बाय डिफॉल्ट एनेबल राहणार असून वापरकर्ता आपला डीपी सहज चेंज करू शकेल. पण त्याचा जो काही डीपी असेल तो ग्रुप चॅटमध्ये पाहायला मिळेल.