US Federal Reserve Bank: महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदर वाढवण्याबाबत US फेडची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी (1 फेब्रुवारी) आपल्या व्याजदरात एक चतुर्थांशाने वाढ केली. या निर्णयामुळे अमेरिकेच्या चलनावर आणि आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून आले आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेने मार्चपासून सलग आठव्यांदा ही वाढ आहे. फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयानंतर आता व्याजदर 4.50 वरून 4.75 अंकांवर पोहचले आहे. महागाई लक्षात घेता पुढील काळातही दरवाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
पेट्रोल, डिझेल महागणार?
फेडने यापूर्वीही व्याजदरात मोठी वाढ केली होती. मात्र, ही वाढ तुलनेने कमी होती मात्र यावेळी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक ग्राहक आणि व्यावसायिकांवरील कर्जांचा बोजा वाढणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आर्थिक मंदीचा धोका वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पेट्रोल,डिझेल आणि ज्या वस्तू भारतात आयात केल्या जातात त्यावर होणार आहे. विशेष म्हणजे भारताताला क्रूड ऑईल आयात करण्यासाठी यापुढे जास्त पैसे मोजावे लागू शकतात. त्याच सोबत इतर वस्तूंसाठी देखील जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
वर्षाच्या अखेरीस पुन्हा होऊ शकते व्याजदरात वाढ
फेडरल रिझर्व्हने दोन दिवसांच्या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महागाई काही प्रमाणात कमी झाली असली तरीही अजून ती उच्च पातळीवर आहे. 15 डिसेंबरलाच व्याजदरात 0.50 बेसिस पॉईंटने वाढ केली होती. या वर्षाच्या अखेरीस व्याजदरात 0.75 टक्के वाढ होणे अपेक्षित असणार आहे. यूएस फेडच्या या निर्णयाचा फटका अमेरिकेसह अनेक देशांना बसणार आहे. अमेरिकेला सध्या चार दशकांतील सर्वात मोठ्या महागाईला सामोरे जावे लागत असून सातत्याने व्याजदरात वाढ करावी लागत आहे.