ट्विटरची ब्लू टिक पुन्हा एकदा वादात सापडणार असं दिसतंय. कालच ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरविषयीचे कुठलेही निर्णय घेताना ग्राहकांचा ऑनलाईन पोल घेण्याचा निर्वाळा दिला होता. या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी मस्क यांनी ब्लू-टिक असेल तरंच ट्विटर पोलमध्ये सहभागी होता येईल, असं म्हटलंय.
मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर घेतलेल्या निर्णयांना अगदी ट्विटरच्या नियमित ग्राहकांचाही विरोध होत होता. त्यांनी नवीन आणलेल्या नियमावलीला लोकांनी विरोध केल्यावर मस्क यांनी जाहीर माफी मागितली. आणि असं पुन्हा होणार नाही म्हणत, ट्विटरच्या निर्णय प्रक्रियेत ग्राहकांना सहभागी करून घेण्याची योजना जाहीर केली.
म्हणजे, ट्विटरमध्ये कुठलाही धोरणात्मक बदल करताना ट्विटरवर ऑनलाईन पोल घेण्यात येईल, असं ते म्हणाले. पहिलाच पोल त्यांनी जाहीर केला. आणि त्यासाठी प्रश्न विचारला, ‘ट्विटरचा अध्यक्ष म्हणून मी पदावरून पायउतार होऊ का?’
आणि या पोलला नेमका 57% ग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. म्हणजेच, मस्क यांनी ट्विटरचे अध्यक्ष राहू नये असा हा कौल होता. या निकालानंतर मस्क यांनी काही तास प्रतिक्रियाच दिली नव्हती. ती अखेर पोलच्या सहा तासांनी दिली. आणि यात त्यांनी म्हटलंय की, फक्त ब्लू टिक असलेल्यांनाच मतदानात सहभागी होता येईल.
आधी घेतलेल्या पोलचा निर्णय ते मान्य करणार का हे अजून गुलदस्त्यातच आहे. पोल घेताना त्यांनी अध्य़क्षपदासाठी दुसरा पर्यायही दिला नव्हता.
ट्विटर ताब्यात घेतानाच्या डीलपासून एलॉन मस्क वादातच सापडत आले आहेत. आणि यात अजूनही सुधारणा झालेली नाही. शिवाय ट्विटरसमोर आर्थिक अडचणीही आहेत.
ट्विटर ताब्यात घेताना मस्क यांनी 44 अब्ज अमेरिकन डॉलर मोजले आहेत. ही किंमतही तेव्हा जास्त मानली जात होती. आणि मस्क यांनीही या व्यवहारातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, ट्विटर व्यवस्थापनाने कोर्टातून ऑर्डर आणली आणि मस्क यांना हा व्यवहार पूर्ण करावा लागला.
ट्विटर ताब्यात घेतल्यावर मस्क यांनी मोठ्या प्रमाणावर नोकर कपात केली. आणि उरलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातलं वातावरण ‘हार्ड कोअर’ कामाचं असेल अशी ताकीदही त्यांनी दिली होती. ट्विटरच्या व्यवस्थापनात बदल केले नाहीत तरही कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर आहे, असं त्यांनी वारंवार बोलून दाखवलंय. आणि पैसे मिळवण्याचा एक मार्ग म्हणूनच त्यांनी ब्लू टिक फिचर विनामूल्य मिळणार नाही, असं जाहीर केलं.
ल घेतानाही मस्क नसतील तर दुसरे कोण हा पर्यायही त्यांनी दिला नव्हता.
आता तर पोल घेण्याच्या धोरणातच त्यांनी घुमजाव केलेलं दिसतंय. कारण, ब्लू टिकचे निर्णय पोलवरून होणार नाहीत, असं ते म्हणतायत.