Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Blue : ट्विटरची ब्लू टिक पुन्हा सुरू, प्रिमिअम सेवेत कोणत्या सुविधा मिळणार?

ब्लू ट्विटर

Image Source : www,twitter.com

एलॉन मस्क यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे ट्विटर ब्लू या नवीन सेवेची सुरुवात केली आहे. या प्रिमिअम सेवेत तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील. आणि त्या बदल्यात ब्लू टिक, ट्विट एडिट करण्याची सोय आणि इतर काही सुविधा मिळतील

ट्विटरने (Twitter Inc.) अखेर आपली प्रिमिअम सेवा, ब्लू ट्विटर (Blue Twitter) पुढच्या आठवड्यापासून सुरू करणार असल्याचं स्पष्ट केलंय. या प्रिमिअम सेवेसाठी (Twitter Primium Service) तुम्हाला महिन्याला 8 अमेरिकन डॉलर मोजावे लागतील. तेच ही सेवा आयफोनच्या (Iphone) IOS प्रणालीवर वापरणार असाल तर हे दर वाढून 11 डॉलर प्रति महिना होतील. प्रिमिअम सेवेत तुम्हाला ब्लू टिकमार्क मिळेल. आणि ट्विट बदलताही येईल.       

गंमत म्हणजे ट्विटर कंपनीने ही माहिती आपल्याच प्लॅटफॉर्मवर ट्विट करून दिलीय. यात त्यांनी असंही म्हटलंय की, ब्लू ट्विटरमध्ये ब्लू बरोबरीने करड्या रंगाची (Grey) आणि सोनेरी रंगाचीही (Golden) टिक असेल. करड्या रंगाची टिक सरकारी कंपन्या तसंच बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी असेल. तर सोनेरी रंगाची टिक खाजगी कंपन्यांसाठी असेल.       

तुम्ही ट्विटर अकाऊंटमधील कोणतीही माहिती बदललीत म्हणजे एडिट केलीत तर तुमची ब्लू टिक तात्पुरती जाईल. आणि ट्विटरने माहितीची सत्यता तपासून पाहिल्यावर ती पुन्हा दिसायला लागेल. तुम्ही प्रोफाईल फोटो बदललात किंवा प्रोफाईलवरचं नाव बदललंत तरी तात्पुरती ही टिक जाईल.      


‘आम्ही ट्विटर ब्लू पुन्हा रिलाँच करत आहोत. इथून पुढे वेबसाईटवर ट्विटर वापरण्यासाठी महिन्याला 8 अमेरिकन डॉलर मोजावे लागतील. तर आयफोनवर ते वापरायला 11 अमेरिकन डॉलर प्रति डॉलर इतकं शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. ब्लू चेकमार्कमध्ये ट्विट एडिट करणं, चांगल्या दर्जाचे व्हीडिओ अपलोड करणं, रिडर मोड या सुविधा मिळतील.’ असं ट्विटर कंपनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.       

ट्विटर कंपनीची स्थापना 2006मध्ये झाली. कंपनीचं मुख्य ऑफिस अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यात सॅन फ्रान्सिस्को इथं आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनी 44 अब्ज अमेरिकन डॉलरमध्ये ही कंपनी विकत घेतली. तेव्हापासून ट्विटरमध्ये अनेक बदल झाले आहेत.       

कंपनीने मूळ कर्मचाऱ्यांमध्ये ⅔ नोकर कपात केली. त्यानंतर मस्क यांनीच सॉफ्टवेअर अपडेटची घोषणा केली. नवं सॉफ्टवेअर तुमचं अकाऊंट काही कारणांनी बंद करण्यात आलं असेल तर त्याची त्वरित माहिती तुम्हाला देऊ शकतं. याला सोशल मीडियामध्ये Shadow Ban असं म्हणतात.