Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Most Billionaires: जगातील टॉप 10 अब्जाधीश शहरांच्या यादीत भारतातील 'मुंबई' शहर ८ व्या स्थानावर

Top 10 Cities with Most Billionaires

Top 10 Cities with Most Billionaires: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील टॉप 10 शहरांची यादी जाहीर केली असून यामध्ये चीनमधील बीजिंग शहर पहिल्या स्थानावर आहे तर भारतातील मुंबई शहर आठव्या स्थानावर आहे.

Top 10 Cities with Most Billionaires: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने (World of Statistics ) एक यादी जारी केली असून त्यामध्ये जगातील टॉप 10 शहरे निवडली आहेत, जिथे सर्वाधिक अब्जाधीश लोक राहतात (Top 10 Cities with Most Billionaires). जगभरात श्रीमंत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून भारतातही अब्जाधीश लोकांची संख्या वाढली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे या 10 शहरांच्या यादीमध्ये भारताचाही समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या (World of Statistics) यादीनुसार चीनमधील बीजिंग शहर पहिल्या स्थानावर आहे. या यादीत अमेरिकेतील दोन शहरांचाही समावेश करण्यात आला आहे. तर, भारतातील मुंबई शहर या यादीत 8 व्या स्थानावर आहे.

या स्थानावर आहेत ब्रिटन आणि भारतात

ब्रिटनमधील लंडन शहर 63 अब्जाधीशांसह या यादीत 7 व्या क्रमांकाच्या स्थानावर आहे. यानंतर भारतातील मुंबई शहराचा आठवा क्रमांक लागत असून 48 अब्जाधीश या शहरात राहतात असे सांगण्यात आले आहे. भारतासोबतच अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को 48 अब्जाधीशांसह 8 व्या क्रमांकाच्या स्थानावर आहे.

चीन पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या यादीनुसार चीनचे बीजिंग शहर पहिल्या स्थानावर असून  बीजिंगमध्ये 2.30 कोटींहून अधिक लोक राहत आहेत आणि तेथील अब्जाधीश लोकांची संख्या 100 आहे. तसेच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर दुसऱ्या क्रमांकावर असून या शहराची लोकसंख्या 84.7 लाख आहे, त्यापैकी अब्जाधीश लोकांची संख्या 99 इतकी आहे.  

चीनमधील तीन शहरांचा समावेश अब्जाधीशांच्या यादीत   

जगातील टॉप 10 अब्जाधीश शहरांच्या यादीत हाँगकाँग तिसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले असून हॉंगकॉंगमध्ये 80 अब्जाधीश राहतात. यांनतर मॉस्कोचे नाव चौथ्या स्थानावर आहे आणि तेथे 79 अब्जाधीश राहतात. चीनची आणखी तीन शहरे या यादीमध्ये समाविष्ट आहेत. शेन्झेन हे पाचव्या स्थावर असून तेथे 68 अब्जाधीश राहतात. सहाव्या स्थानावर शांघाय शहर असून तेथे 64 अब्जाधीश आहेत. याशिवाय चीनमधील हांगझोऊ शहर 10 व्या क्रमांकाच्या स्थानावर असून तेथे  47 अब्जाधीश आहेत.

चीन आणि अमेरिकेचे वर्चस्व

जागतिक आकडेवारीच्या या यादीमध्ये चीन आणि अमेरिका यांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील दोन शहरे आणि चीनमध्ये चार शहरांचा यामध्ये समावेश झाला आहे. चीनमधील या चार शहरांमध्ये 279 अब्जाधीश राहत असून अमेरिकेच्या दोन शहरांमध्ये 147 अब्जाधीश राहत आहेत.