Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Educational Cost : मुलांचा शैक्षणिक खर्च कमी करण्यासाठी घेऊ शकता 'या' टिप्सचा आधार

Educational Cost

Educational Cost : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा खूप वाढीस लागला आहे. आजकाल मुलांच्या शाळा आणि ट्यूशन फी खूप जास्त झाल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काही टिप्सच्या मदतीने तुमचा खर्च कमी करू शकता.

Educational Cost : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा खूप वाढीस लागला आहे. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश द्यायचा म्हटलं तर त्यांची फी खूप जास्त असते. सर्वसामान्य लोकांना शाळेची फी परवडणारी नसते तर इतर खर्च कसा करायचा? हा प्रश्न उभा राहतो. कमी खर्चात सुद्धा मुलांना उत्तम शिक्षण देता येऊ शकते. त्यासाठी मुलांचे अनावश्यक खर्च कमी करावे लागेल, ज्याची सर्वाधिक गरज आहे त्याच वस्तु मुलांना द्याव्या लागतील. आजकाल मुलांच्या शाळा आणि ट्यूशन फी खूप जास्त झाल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काही टिप्सच्या मदतीने तुमचा खर्च कमी करू शकता. 

आजच्या काळात मुलांना शिकवणे थोडे अवघड आहे. शाळेपासून ते शिकवणीपर्यंत भरमसाठ फी भरल्याने पालकांच्या खिशावर मोठा भार पडतो. आपण मुलांना घरी शिकवून आपला खर्च बर्‍याच प्रमाणात कमी करू शकता.

मुलांना ट्यूशनला न पाठवता घरीच अभ्यास घेणे

खर्च कमी करण्यासाठी घरी अभ्यास करणे हा एक उत्तम पर्याय आहे. प्राथमिक विभागातील मुलांचा अभ्यासक्रम फारसा अवघड नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना घरीच शिकवू शकता. दुसरीकडे, जर तुमची मुले मोठी असतील, तर तुम्ही स्वतः त्यांना सोपे विषय शिकवून खर्च कमी करू शकता. दुसरीकडे, एखादा विषय असेल तर फक्त त्याची ट्यूशन करून घ्या, म्हणजे फी कमी भरावी लागेल. 

मुलांना शिकवण्यासाठी गुगलची मदत घेऊ शकता 

आज गुगलवर तुम्हाला प्रत्येक विषयाशी संबंधित माहिती मिळेल. मग तो गणिताचा अभ्यास असो की विज्ञानाचा. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलांना गुगलवर सर्च करून प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकता. यासोबतच मुले व्हॉईस सर्चसारख्या फीचरच्या मदतीने अभ्यासाशी संबंधित प्रत्येक प्रश्न सोडवू शकतात.

यूट्यूब व्हिडिओ

यूट्यूबवर उपलब्ध व्हिडिओमध्ये तुम्हाला शैक्षणिक लेखन, कविता, कथा आणि प्रेरणादायी व्हिडिओ असे अनेक ऑप्शन मिळतील. या सर्व व्हिडिओंमध्ये असलेला चांगला कंटेंट तुम्ही तुमच्या मुलांना दाखवू शकता.

मोफत ऑनलाइन क्लास 

मोफत क्लास आणि शिष्यवृत्तीच्या मदतीने मुलांना कोणताही खर्च न करता शिकवता येते. तुम्हाला अनेक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मवर कोचिंगसारख्या अनेक सुविधा मिळतील. या सर्व ऑप्शनमुळे मुलांना लागणारा ट्यूशन खर्च कमी होतो आणि तेच पैसे मुलांना पुढील शिक्षणासाठी उपयोगी पडते. 

मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य 

शाळा सुरू झाली की मुलांची शैक्षणिक साहित्य घेऊन मागण्याची धावपळ सुरू होते. त्यांना स्कूल बॅग सोबतच इतरही काही साहित्य घेऊन द्यावे लागते. त्यातील काही साहित्य हे टिकाऊ असतात म्हणजेच पुढील वर्षी सुद्धा वापरता येऊ शकतात. असे साहित्य मुलांना जपून वापरायला सांगितल्यास तुमचा खर्च अजून कमी होऊ शकतो. 

मुलांच्या शिक्षणासाठी निधी कसा गोळा करायचा?

मुलाच्या उच्च शिक्षणासाठी अंदाजे 50 लाख रुपये लागत असेल. तर अशा परिस्थितीत 50 लाख रुपये कसे उभे करायचे हा पहिला प्रश्न उभा राहतो. याचे सोपे उत्तर आहे की यासाठी तुम्हाला नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही आतापासूनच दर महिन्याला काही रक्कम जमा करण्यास सुरुवात केली, तर तुमची मुले उच्च शिक्षण घेण्याच्या वयात येईपर्यंत तुम्ही ही रक्कम जमा करू शकाल.

(Source : navbharattimes.indiatimes.com)