Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Jeevan Tarun Policy: वाढता शैक्षणिक खर्च पाहून टेन्शन येतंय, मग LIC च्या 'या' पॉलिसीत करा गुंतवणूक

LIC Jeevan Tarun Policy

LIC Jeevan Tarun Policy: वाढता शैक्षणिक खर्च लक्षात घेता, पालकांनी योग्य वेळी आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक केले तर त्यातून मुलांसाठी एक चांगला शैक्षणिक फंड तयार होऊ शकतो. देशातील सर्वात मोठी आणि जुनी इन्शुरन्स कंपनी एलआयसीने (LIC) विशेष प्लॅन आणला आहे. या प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूकदार एक फंड उभा करू शकतो.

उच्च आणि दर्जेदार शिक्षण घ्यायचे म्हटले की पैसा हा लागतोच. त्यासाठी पालकांना मुलांच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद सुरुवातीपासूनच करावी लागते. बरेच पालक त्यांच्या मुलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. हल्ली शैक्षणिक खर्च दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मुलांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक टप्प्यांवर  त्यांना एका ठराविक रकमेची गरज पडते. अशा वेळी कर्ज (Loan) काढण्यापेक्षा योग्यवेळी केलेली गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन नक्कीच फायद्याची ठरते. पालकांची हीच आर्थिक गरज लक्षात घेऊन एलआयसीने (LIC) एक विशेष प्लॅन आणला आहे. ज्याचे नाव आहे, 'एलआयसी जीवन तरुण पॉलिसी' (LIC Jeevan Tarun Policy). या पॉलिसीच्या माध्यमातून गुंतवणूकदार आपली विविध उद्दिष्ट्ये साध्य करू शकतात.

एलआयसी (LIC) दरवेळी वेगवेगळ्या गटातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येते. एलआयसी जीवन तरुण पॉलिसी (LIC Jeevan Tarun Policy) ही खास मुलांसाठी बनवण्यात आलेली योजना आहे. योजने  अंतर्गत तरुण पालक यामध्ये गुंतवणूक करून मुलांची भविष्यातील शैक्षणिक खर्चाची तरतूद (Educational Purpose) करू शकतात.

यामध्ये कोण गुंतवणूक करू शकतं?

एलआयसी (LIC) जीवन तरुण पॉलिसीमध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या उद्दिष्ट्यांसाठी गुंतवणूक करू शकतो. मुले लहान असतील, तर यात गुंतवणूक करून शैक्षणिक फंड (Educational Fund) तयार करू शकतात. ज्यातून मुलांच्या उच्च शिक्षणासाठी एक चांगला कॉर्पस फंड तयार होऊ शकतो. 12 वर्षाच्या आतील मुलांच्या नावे यामध्ये गुंतवणूक करता येते. कमीत कमी 3 महिने ते जास्तीत जास्त 12 वर्षांच्या मुलाच्या नावाने ही गुंतवणूक करता येते.

यामध्ये पालक मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक (Monthly, Quarterly, Half Year & Yearly) आधारावर प्रीमिअम भरू शकतात. यामध्ये किती गुंतवणूक केल्यानंतर किती लाभ मिळू शकतो, हे सोप्या पद्धतीने समजून घेऊ.

साधारण किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल?

एखादे मूल 12 वर्षाचे असेल, तर पालकांना पुढील 8 वर्षे यामध्ये गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे मूल 20 वर्षाचे होईपर्यंत पालकांना या स्कीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर पुढील 5 वर्ष पालकांना कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. पाच वर्षानंतर म्हणजेच मुलाच्या वयाच्या 25 व्या वर्षी या योजनेतील संपूर्ण रकमेवर दावा करता येऊ शकतो. ही रक्कम पालक मुलांच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकतात. या योजनेतून गुंतवणूकदाराला 75,000 हजारांची आश्वासित रक्कम हवी असेल तर 5 हजार आणि 1 लाखापर्यंतच्या रकमेसाठी 10 हजार रुपयांच्या टप्प्यात गुंतवणूक करावी लागेल.

गुंतवणुकीचे गणित समजून घ्या

जर मुलाचे वय 12 वर्ष असेल आणि पालकांनी त्याच्या नावाने प्रत्येक दिवसाला 150 रुपये गुंतवले तर, मासिक 4,500 रुपयांचा हप्ता पालक या योजनेत भरतील. म्हणजेच वर्षाला यात 54,000 रुपयांची गुंतवणूक केली जाईल. ही गुंतवणूक पुढील 8 वर्षापर्यंत सुरू राहील. म्हणजे या आठ वर्षात 4.32 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. ज्यावर गुंतवणूकदाराला 2.47 लाख रुपयांचा बोनस दिला जाईल. मुलाच्या वयाच्या 25 व्या वर्षी त्याला अंदाजे 7 लाख रुपये मिळतील. ही रक्कम तो त्याच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकतो.

Source: www.dnaindia.com