जीवनात आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचा वापर करत असतो. परंतु त्यावरील सर्व मोफत सुविधांबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसते. आपण जाणून घेणार आहोत रोजच्या वापरातील कोणत्या गोष्टींसोबत मोफत विमा मिळतो कारण या वस्तूंमुळे वित्तीयहानी किंवा अपघात होऊ शकतो. म्हणून या वस्तूंसह विमा संरक्षण मिळते.
Table of contents [Show]
LPG गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder)
एलपीजी सिलेंडर ही एक अशी वस्तू आहे, ज्याचा वापर देशातील एक मोठा ग्राहकवर्ग करतो, परंतु लोकांना माहिती नाही की या सिलेंडरवर मोफत विमा देखील उपलब्ध असतो. होय, एलपीजी कनेक्शन घेतल्यावर वैयक्तिक आपघातात होणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी विमा संरक्षण उपलब्ध असते.
डेबिट कार्ड (Debit Card)
आजच्या काळात बहुतांश लोक एटीएम कार्ड वापरतात. पण एटीएम कार्डवरही विमा उपलब्ध असतो हे अनेकांना माहीत नसते. एटीएम कार्ड खाजगी बँकेचे असो वा सरकारी, प्रत्येक कार्डासोबत मोफत विमा कवच देखील उपलब्ध आहे. हे अपघाती कव्हर 25 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
ईपीएफओ (EPFO)
नोकरी करत असाल तर पगारातील काही रक्कम EPFO खात्यात जमा होत असते. 1976 साली लागू झालेल्या लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI) अंतर्गत EPFO खाते धारकाला 7 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. या स्कीममधून मिळणारी विम्याची रक्कम मागील 12 महिन्यांच्या पगारावर अवलंबून असते.
जन धन खाते (Jan Dhan Accounts)
प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत, जन धन खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड आणि बचत बँक खाते दिले जाते. या प्रकरणात, जन धन खातेधारकाला रुपे डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा आणि अतिरिक्त 30,000 रुपये (अपघाती मृत्यू झाल्यास) दिले जातात. जन धन खातेधारकाला अशा विम्यासाठी कोणताही प्रीमियम भरण्याची गरज नाही.
या वस्तूंवर विमा का गरजेचा असतो? (Why is Insurance Required On These Items?)
विम्यामुळे आपल्याला आर्थिक संरक्षण मिळते. कुठलीही अनपेक्षित घटना घडल्यास आपल्याला विम्याचे महत्व कळते. केंद्र सरकारने या गोष्टींचा धोका ओळखून सोबत विमा संरक्षण देणे सर्व कंपन्यांसाठी अनिवार्य केले आहे. विमा पॉलिसी असतांना देखील काही दुर्घटनांचा त्यात समावेश होत नाही यावेळी हे विमा संरक्षण फायदेशीर ठरते.
(www.zeebiz.com)