प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत ग्राहक सरकारी बँकांप्रमाणेच, खासगी बँकांमध्येही जन धन खाते सुरु करु शकतात. जर कोणाचे पूर्वीपासून एखादे बचत खाते असल्यास ते खाते जन धन खात्यामध्ये बदलता येऊ शकते. जन धन खाते कसे सुरू करायचे आणि बचत खाते जन धन खात्यात कशाप्रकारे बदलायचे या दोन्ही प्रक्रिया सोप्या आहेत. सरकारी बॅंकांसोबत धनलक्ष्मी बँक, येस बँक, HDFC बँक, ICICI बँक, एक्सिस बँक, फेडरल बँक, ING वैश्य, कोटक महिंद्रा, कर्नाटक बँक, इंडसइंड बँक या प्रायव्हेट बँकांमध्ये जनधन खाते सुरु करता येऊ शकतं.
प्रधानमंत्री जन धन योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री जन धन योजना म्हणजे बॅंकिंग सेवा देणारी योजना. उदाहरणार्थ बॅंकेचे आर्थिक व्यवहार, बचत आणि मुदत ठेव पैसे पाठवणे, कर्ज व विमा पेन्शन नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देणे. तसेच ही योजना राष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहारात सर्वांचा समावेश व्हावा, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
प्रधानमंत्री जन धन योजनेचे फायदे
- कोणत्याही बॅंकेमधून झिरो बॅलन्स बचत खाते उघडता येते.
- खातेधारकाला निशुल्क मोबाईल बॅंकिंगची सुविधा मिळते.
- बॅंकेतील ठेवींवर व्याज मिळते.
- खातेदाराला 2 लाख रूपयांचा अपघात विमा संरक्षण मिळते.
- प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत लाभार्थीच्या मृत्यूबाबत अटींची पूर्तता केल्यास 30 हजार रूपयांचा जीवन विमा मिळतो.
- संपूर्ण भारतात फंड ट्रान्सफर करता येऊ शकतो.
- सरकारी योजनांचा लाभ या खात्यांमधून घेता येऊ शकेल.
- सहा महिन्यापर्यंत या खात्यातून योग्यप्रकारे व्यवहार झाल्यास खातेधारकाला ओव्हरड्राफ्टची सुविधी दिली जाते.
खाते सुरू करण्यासाठी नियम
1. भारतात राहणारा 10 वर्षांवरील कोणताही नागरिक जन धन खाते सुरू करू शकतो.
2. लाभार्थीचे बॅंकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
3. अपघात विमा संरक्षण फायदा उपलब्ध होण्यासाठी रूपे कार्डचा वापर 45 दिवसातून एकदा झाला पाहिजे.
4. खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. पण चेकबुकची सुविधा घेतली तर मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे.
5. ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळण्यासाठी 6 महिन्यापर्यंत खात्यातून समाधानकारक व्यवहार होणे आवश्यक आहे.
जन धन खाते सुरु करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- वोटर आयडी कार्ड
- पासपोर्ट
- मनरेगा जॉब कार्ड