सामान्यत: लार्ज शेअरच्या परफॉर्मन्सकडे सर्वांचे लक्ष असते. यात पेनी स्टॉककडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते.असे कोणते Penny Stocks आहेत ज्यांनी यंदा उत्तम परतावा (रिटर्न्स) दिला आहे ते जाणून घेऊया.
कॅसर कॉर्पोरेशन, हेमांग रिसोर्सेस, अलायन्स इंटिग्रेडेट मेटालिक्स, , केबीएस इंडिया अशा काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना खूप चांगले रिटर्न्स दिले आहेत.
Table of contents [Show]
केसर कॉर्पोरेशन (Kaiser Corporation)
केसर कॉर्पोरेशन स्टॉक्स मोठ्या मल्टिबॅगर शेअर्सपैकी एक ठरला आहे. वर्षभरापूर्वी 2 रुपयापेक्षाही कमी असलेला हा शेअर आता बुधवारी बाजार बंद होताना 57 रुपयावर पोचला आहे. एक वर्षाचा विचार केला तर तब्बल 3484.91 टक्के इतका परतावा या शेअर्सने दिला आहे. 52 आठवडयाचा विचार केला तर 1.52 असा निच्चांकी तर 130.55 असा उच्चांकी दर नोंदवला आहे.
जानेवारी 2022 च्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरची किंमत ही 2.71 रुपये होती. आता ही किंमत वाढून 45 रुपये झाली आहे. 2022 मध्ये या शेअर्सच्या किमतीमध्ये 1,578 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभारत या शेअर्सच्या किमतीमध्ये 5.38 टक्के इतकी घट झाली आहे.
हेमांग रिसोर्सेस (Hemang Resources ltd)
या शेअर्समधील गेल्या 52 आठवड्यातील उच्चांक 80 .90 रुपये तर निच्चांक 2.95 पैसे इतका नोंदवण्यात आला आहे. रुपये इतका आहे. वर्षभरापूर्वी 3 रुपये 10 पैसे इतका असणारा हा शेअर आता 52.10 रुपये इतका झाला आहे. बुधवारी बाजार बंद होताना 52.10 रुपये इतकी या शेअरची किमत होती. वर्षभरात 1580.65% म्हणजेच 49 रुपयांची वाढ या शेअर्सच्या किमतीमध्ये झाली आहे. गेल्या महिनाभरात 11.84 टक्क्यांची घसरण या शेसर्सच्या किमतीमध्ये झाली आहे.
केबीएस इंडिया (KBS India Stock)
KBS India ही कंपनी वेलथ मॅनेजमेंटशी संबंधित काम करत असते. हाही असाच एक शेअर्स आहे जो वर्षभरापूर्वी 10 रुपायापेक्षा कमी किमतीत मिळत होता. बुधवारी बाजार बंद होताना 116.85 इतकी त्याची किमत होती. यात 1113.40 टक्के इतकी वाढ झाली आहे. एका वर्षात 107.22 रुपयांनी हा शेअर्स वाढला आहे. गेल्या महिनाभरातही हा शेअर्स 41.40 रुपयांनी वाढला आहे.
Penny Stocks म्हणजे काय?
ज्या शेअर्सची किमत शेअर मार्केटमध्ये 10 रुपये किंवा त्याहून कमी असेल अशा स्टॉक्सना penny stocks म्हटले जाते. गुंतवणूकदारांसाठी हे स्टॉक्स सर्वाधिक रिस्क असलेले स्टॉक्स समजले जातात.
शेअर मार्केटमध्ये हे शेअर्स देखील चमकदार कामगिरी करतात. मात्र अशा शेअर्सडे काही वेळा दुर्लक्ष होण्याची देखील शक्यता असते.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)