FD Rate Increase: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन वर्षात अनेक बँकांनी मुदत ठेवी(FD) दरांमध्ये वाढ केली आहे. वाढत्या महागाईत तुम्ही देखील बँकेमध्ये गुंतवणूक करून भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहोत. कोणत्या आहेत त्या बँका आणि किती मिळतोय नवीन वर्षात व्याजदर चला जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
पहिल्याच आठवड्यात वाढले एफडीचे व्याजदर
आरबीआयने(RBI) डिसेंबर महिन्यात सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ केल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. सध्या रेपो दर हा 6.25 टक्के इतका आहे. काही आर्थिक विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी 2023 मध्येही रेपो दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या क्रमाने जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात अनेक बँकांनी आपल्या एफडीचे(FD) दर वाढवले आहेत. या बँकांच्या वाढलेल्या व्याजदरांबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊयात.
Indian Overseas Bank FD Rates
इंडियन ओव्हरसीज(Indian Overseas Bank) बँकेने 1 जानेवारीपासून 7 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 75 बेस पॉइंट्सने व्याजदर वाढवले आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 444 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त 6.55 टक्के व्याज देत असून त्याच कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दर देत आहेत याशिवाय 80 वर्षांवरील ग्राहकांना अतिरिक्त 0.75 टक्के व्याजदर देत आहे.
Bandhan Bank FD Rates
बंधन बँकेने(Bandhan Bank) 5 जानेवारीपासून मुदत ठेवींच्या दरात वाढ केली असून या वाढीनंतर बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3 टक्के ते 5.85 टक्के व्याज दर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्याच कालावधीसाठी FD वर 3.75 ते 6.60 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7.50 टक्का आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 600 दिवसांच्या FD वर 8 टक्के व्याज दर देत आहे.
Punjab National Bank FD Rates
पंजाब नॅशनल बँकेने(Punjab National Bank) 1 जानेवारीपासून आपले बचत खाते आणि मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले आहेत. PNB आता त्यांच्या बचत खात्यात 100 कोटी आणि त्याहून अधिक रक्कम असलेल्या ग्राहकांना 25 बेसिस पॉइंट अधिक व्याज दर देणार आहे. त्याच वेळी, बँक आता वेगवेगळ्या कालावधीसाठी FD वर 50 बेस पॉइंट अधिक व्याजदर ग्राहकांना देणार आहे.
Yes Bank FD Rates
यस बँकेने(Yes Bank) 3 जानेवारीपासून त्यांचे मुदत ठेवींचे दर बदलले असून या बदलानंतर, बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.25 ते 7 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्याच कालावधीच्या FD वर 3.75 ते 7.75 टक्के व्याज देत आहे. आपल्या सामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त 7.50 टक्के व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 30 महिन्यांच्या FD वर जास्तीत जास्त 8 टक्के व्याजदर देत आहे.
Kotak Mahindra Bank FD Rates
कोटक महिंद्रा बँकेने(Kotak Mahindra Bank) 4 जानेवारीपासून वेगवेगळ्या कालावधीसाठी मुदत ठेवींच्या दरांमध्ये 50 बेस पॉइंट्सची वाढ केलीअसून व्याजदराच्या वाढीनंतर, बँक आता 390 दिवसांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सामान्य ग्राहकांना 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50 टक्के व्याज दर देत आहे.