Why Pay Rent Using a Credit Card: बदलत्या जगानुसार आता बदलणे आवश्यक आहे. पूर्वी भाडे रोख किंवा नेटबॅकिंगव्दारे देण्यात येत होती. आता भाडे देण्यासाठी एकापेक्षा एका ऑनलाइन प्लॅटफॉर्म आली आहेत. या प्लॅटफॉर्मचा कसा वापर करून क्रेडिट कार्डव्दारे भाडे भारायचे आणि पैशांची बचत करायची हे जाणून घेऊयात थोडक्यात.
Table of contents [Show]
कॅशबॅक ऑफर (Cashback Offer)
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून भाडे भरता, तेव्हा अनेक बँका आणि ई-कॉमर्स पोर्टल्स तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचे क्रेडिट कार्ड वापरताना सर्वोत्तम कॅशबॅक देतात. त्यावेळी तुम्हाला मिळालेली कॅशबॅकची रक्कम ही थेट तुमच्या खात्यात नियमितपणे जमा होते. त्यामुळे तुमची कॅशबॅकच्या स्वरूपात बचत होते.
रिवॉर्ड पॉइंट्स मिळवा (Earn Reward Points)
रोख व्यवहारांप्रमाणे, क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही भाडे भरले, तर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स मिळू शकतात. जे भविष्यातील खरेदीवर किंवा प्रसिद्ध ब्रँड्सकडून बुकिंगवर तुम्हाला योग्य ऑफर देऊ शकतात. त्या ऑफरचा लाभ घेऊन तुम्हाला एक प्रकारची बचत करण्याची संधी मिळते .
मोफत क्रेडिट कालावधी (Free Credit Period)
ज्यावेळी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून भाडे भरता, त्यावेळी तुम्हाला 45 दिवसांचा मोफत क्रेडिट कालावधी मिळतो. त्यामुळे, या 45 दिवसांत तुम्ही तुमचे क्रेडिट कार्डचे बिल भरल्यास, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज भरावे लागणार नाही.
वेळेवर पेमेंट (Timely Payment)
समजा, तुमचा पगार 5 किंवा 6 तारखेला जमा होतो. पण तुमच्या घरमालकाला भाडे महिन्याच्या पहिल्याच दिवशी द्यावे लागते. अशा या कठिण परिस्थितीत तुम्हाला या क्रेडिट कार्डचा वापर करता येईल.
वार्षिक खर्च मर्यादा पूर्ण करा (Meet the Annual Spending Limit)
ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे अशा अनेक लोकांना त्यांच्या क्रेडिट कार्डची वार्षिक खर्च मर्यादा पूर्ण न करण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यावेळी तुम्ही दर महिन्याला क्रेडिट कार्ड वापरून भाडे भरू शकता आणि तुम्ही तुमची वार्षिक खर्च मर्यादा सहज पूर्ण करू शकता.