Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Davos: काय म्हणता? तालुक्याच्या गावी भरते World Economic Forum चे संमेलन, लोकसंख्या केवळ 11 हजार!

Davos

Image Source : www.cnbc.com

दावोस (Davos) हे स्वित्झर्लंडमधील (Switzerland) हे एक तालुक्याचे गाव असून डिसेंबर 2014 च्या जनगणनेनुसार केवळ 11 हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. 2020च्या आकडेवारी नुसार या गावाची कायमस्वरूपी लोकसंख्या 10,832 आहे. या वर्षीच्या संमेलनात 2,500 लोक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे.

जागतिक आणि प्रादेशिक स्तरावर उद्योग विषयक अजेंडा तयार करण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) ही संस्था काम करते. अर्थविषयक मुद्द्यांवर काम करणारी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.खाजगी आणि सार्वजनिक संस्थांना एकाच व्यासपीठावर येऊन औद्योगिक विषयासंबंधी चर्चा, करार आणि गुंतवणुकीस ही संस्था मदत करते. 1971 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. जीनेव्हा विद्यापीठात युरोपियन मॅनेजमेंट विषयावर काम करणाऱ्या प्राध्यापक क्लॉस एम. श्वाब (Klaus Schwab) यांनी या संस्थेची स्थापना केली. तेव्हा या संस्थेचे मुख्यालय जीनेव्हा, स्वित्झर्लंड (Geneva, Switzerland) येथे होते. सध्या संस्थेचे मुख्यालय कोलोग्नी (Cologny, Switzerland) येथे आहे.  

हे शहर केवळ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकांसाठीच प्रसिध्द नाही तर अनेक पर्यटकांसाठी देखील हे बकेट लिस्टमधले (Bucket List) ठिकाण आहे. आइस हॉकी (Ice Hockey) या खेळासाठी देखील हे शहर ओळखले जाते. हा खेळ खेळण्यासाठी आणि बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक या शहरात येत असतात. स्पेंगलर करंडक (Spengler Cup) नावाने आइस हॉकीचे आंतरराष्ट्रीय सामने येथे भारतात.  

दावोस शहराची वैशिष्ट्ये माहिती आहेत का? 

World Economic Forum ची वार्षिक हिवाळी बैठक स्वित्झर्लंड येथील दावोस (Davos) या शहरात भरते.दरवर्षी जानेवारी महिन्यात हे संमेलन भरत असते. 2023 चे हे संमलेन हे 53 वे संमेलन असणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे संमेलन ऑनलाईन पद्धतीने भरवले गेले होते. दावोस हे स्वित्झर्लंडमधील हे एक तालुक्याचे गाव असून डिसेंबर 2014 च्या जनगणनेनुसार केवळ 11 हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. 2020च्या आकडेवारी नुसार या गावाची कायमस्वरूपी लोकसंख्या 10,832 आहे. या वर्षीच्या संमेलनात 2,500 लोक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे. 

थॉमस मान यांच्या 'द मॅजिक माउंटन' या कादंबरीसाठी दावोस या ठिकाणाचा उल्लेख केलेला आढळतो. या कादंबरीमुळे दावोस शहराला जागतिक पातळीवर ओळख मिळाली होती. पुढे World Economic Forum च्या बैठकांमुळे हे शहर नेहमीच चर्चेत राहिले आहे.  19 व्या शतकाच्या सुरुवातीला हे शहर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ओळखले जाऊ लागले. इथले हवामान आरोग्यासाठी उत्तम असल्याचा दावा जगभरातील डॉक्टरांनी केला होता. क्षयरोग, फुफ्फुसांचे विकार यावर उपाय म्हणून हवाबदलासाठी पाश्चिमात्य देशांनी दावोसला पंसती दिल्याचे अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत.