Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Economic Forum 2023:दोन दिवसांत जागतिक गुंतवणूकदारांसोबत महाराष्ट्र सरकारचे ₹ 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार

WEF

Image Source : www.indiatoday.in

स्वित्झर्लंड येथील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर झालेले आहेत. अवघ्या दोन दिवसांत जागतिक गुंतवणूकदारांसोबत ₹ 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारने केले असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

स्वित्झर्लंड येथील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर झालेले आहेत. अवघ्या दोन दिवसांत जागतिक गुंतवणूकदारांसोबत ₹ 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारने केले असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.    

जागतिक गुंतवणूकदार चांगल्या पायाभूत सुविधा, व्यावसायिक वातावरण आणि सरकारचा पाठिंबा या गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणूक करतात.या सर्व सुविधा महाराष्ट्र सरकार देत असल्याने महाराष्ट्र राज्यात काम करण्यास अनेक कंपन्या उत्सुक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अवघ्या दोन दिवसांत जागतिक गुंतवणूकदारांसोबत ₹ 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले असल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांना दिली. गुंतवणूकदार आपल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी लवकरच मुंबईला भेट देतील, अशी माहिती देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.   

"आमच्या सरकारसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. हे गुंतवणुकीचे निर्णय तेव्हाच घेतले जातात जेव्हा गुंतवणूकदारांचा सरकारवर विश्वास असतो आणि आमच्या क्षमतेबद्दल खात्री असते. उद्योग उभारणीसाठी जे काही हवे आहे, ते आम्ही देण्यास तयार आहोत आणि राज्य सरकार त्यांच्या सर्व कायदेशीर मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. दळणवळणाची साधने ही महाराष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आम्ही केलेल्या अचूक नियोजनांमुळे जगभरातील उद्योगधंदे महाराष्ट्र राज्याकडे आकर्षित होत आहेत," असे शिंदे म्हणाले.    

‘या’ कंपन्यांनी केला सामंजस्य करार    

  • ग्रिनको एनर्जी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमीटेड – 12 हजार कोटींची गुंतवणूक   
  • हाथवेय होम सर्व्हिसेस ओरेन्डा इंडिया – 16 हजार कोटींची गुंतवणूक    
  • आयसीपी इनव्हेसमेंट/इंडस कॅपिटल – 16 हजार कोटींची गुंतवणूक    
  • रुखी फुड्स – 250 कोटींची गुंतवणूक    
  • निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेड लिमीटेड – 1 हजार 650 कोटींची गुंतवणूक   

सबसिडी, उत्तम पायाभूत सुविधा आणि कामांना जलद मंजुरी हे मुद्दे देखील महाराष्ट्रात गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा वरचढ ठरणारे 'चुंबक' असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या वर्षीच्या WEF वार्षिक सभेत महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडूसह अनेक राज्ये सहभागी झाले आहेत.