Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Economic Forum: उद्योगपती आणि गुंतवणूकदार का जातात Davos ला ?

WEF

Image Source : www.moneycontrol.com

जगात औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. व्यवसाय, राजकारण, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील जगातील आघाडीच्या लोकांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणून उद्योगधंदे वाढीस लावण्यासाठी ही संस्था उपयोगी ठरली आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) ही अर्थविषयक मुद्द्यांवर काम करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जागतिक आणि प्रादेशिक स्तरावर उद्योग विषयक अजेंडा तयार करण्यासाठी ही संस्था काम करते. खाजगी आणि सार्वजनिक संस्थांना एकाच व्यासपीठावर येऊन औद्योगिक विषयासंबंधी चर्चा, करार आणि गुंतवणुकीस ही संस्था मदत करते. 1971 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. जीनेव्हा विद्यापीठात युरोपियन मॅनेजमेंट विषयावर काम करणाऱ्या प्राध्यापक क्लॉस एम. श्वाब ( Klaus Schwab)  यांनी या संस्थेची स्थापना केली. तेव्हा या संस्थेचे मुख्यालय जीनेव्हा, स्वित्झर्लंड (Geneva, Switzerland)येथे होते. सध्या संस्थेचे मुख्यालय कोलोग्नी (Cologny, Switzerland) येथे आहे.   

जगात औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. व्यवसाय, राजकारण, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील जगातील आघाडीच्या लोकांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणून उद्योगधंदे वाढीस लावण्यासाठी ही संस्था उपयोगी ठरली आहे.   

कोण घेऊ शकतात सदस्यत्व?   

या संस्थेचे सदस्यत्व खाजगी आणि सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या जगभरातील उद्योग कंपन्यांसाठी खुले आहे. प्रादेशिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्था देखील यात सहभागी  होऊ शकतात. विकसित आणि विकसनशील देशांचे प्रतिनिधि यांत मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.   

दावोसला भरते वार्षिक संमेलन!  

World Economic Forum ची वार्षिक हिवाळी बैठक स्वित्झर्लंड येथील दावोस (Davos) येथे भरते.जानेवारी महिन्यात हे संमेलन भारत असते. या वर्षीचे संमलेन हे 53 वे संमेलन असणार आहे.  स्वित्झर्लंडमधील हे एक तालुक्याचे गाव असून डिसेंबर 2014 च्या जनगणनेनुसार केवळ 11 हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. या वर्षीच्या संमेलनात 2,500 लोक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे.  

कोविड-19 नंतर दोन वर्षांनी भरते आहे संमेलन!  

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली 2 वर्षे हे संमेलन प्रत्यक्षरित्या भरले नव्हते, ऑनलाईन पद्धतीने गेली 2 वर्षे हे संमलेन भरवले गेले होते. या वर्षी कोविड आणि युक्रेन-रशिया युद्ध यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते आहे. यावर्षीची संमेलनाची थीम 'विखंडीत जगातील परस्पर सहकार्य' (Cooperation in a Fragmented World) अशी आहे. ज्याचा उद्देश जगाला भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांचे निराकरण करणे आणि नाविन्यपूर्ण उपायांना प्रोत्साहन देणे हे आहे. 16 ते 20 जानेवारी दरम्यान हे संमेलन दावोस येथे भरणार आहे.