Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Saving Tips: या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत मिळेल कर सवलत

Income Tax

Income Tax Saving Tips: आर्थिक वर्ष 2022-23 संपत आलं आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही टॅक्स सेविंग प्लानिंग करत असाल तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.

जर तुमचं टॅक्स सेविंग प्लानिंग  झालं असेल तर इनकम टॅक्स रिटर्न भरताना कर सवलतीचा दावा तुम्ही करू शकता. आरबीआयने जाहीर केलेल्या काही ठराविक गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हांला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो. इनकम टॅक्स एक्ट सेक्शन 80 सी (80 C) अंतर्गत कर सवलत मिळवणे ही अगदीच सामान्य गोष्ट आहे, याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर काळजी करू नका. या लेखात जाणून घ्या अशा काही गुंतवणूक योजना जे तुमचे पैसे वाचवू शकतात आणि चांगला परतावा देखील मिळवून देऊ शकतात. इनकम टॅक्सच्या कलम 80 सी अंतर्गत अशा काही सरकारी योजना आहेत ज्यात तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळवू शकता. जाणून घ्या अशा काही योजना       

1. राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme):  या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला इनकम टॅक्सच्या कलम  80 C अंतर्गत सूट मिळते. सोबत ही योजना तुम्हाला निवृत्तीनंतर चांगला परतावा देते. रिटायमेंट प्लानिंगसाठी ही एक उत्तम योजना मानली जाते.       

2. पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund):  इनकम टॅक्स वाचवण्यासाठी या योजनेचा अनेक लोक वापर करतात. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 7.1% रिटर्न मिळवू शकता. तसेच या योजनेअंतर्गत वर्षाला 1.50 लाखपर्यंत तुम्ही कर सवलत मिळवू शकता.        

3. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees’ Provident Fund): या योजनेत गुंतवणूक केल्यास 8.1% पर्यंत परतावा मिळू शकतो. सोबतच या योजनेत कर सवलत देखील मिळते.  इनकम टॅक्सच्या कलम  80 C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत याद्वारे मिळते.        

4. इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम (Equity Linked Saving Scheme): ही एक म्युचुअल फंड स्कीम आहे ज्यात तुम्ही अगदी 100 रुपयांची देखील गुंतवणूक करू शकता. या योजनेत देखील  1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत ग्राहकांना दिली जाते.        

5. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (National Saving Scheme): भारतीय पोस्ट (Indian Post) विभागाची ही प्रसिध्द अशी एक सेविंग स्कीम आहे. यावर ग्राहकांना आकर्षक परतावा देखील मिळतो. या योजनेचा मुदत कालावधी हा 5 वर्षे इतका आहे. यात तुम्ही 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवणुकीसाठी कुठली मर्यादा नाहीये.        

6. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana): ही योजना 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीबाबद आहे. या योजनेत 7.6% इतका व्याजदर दिला जातो. वार्षिक 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.5 लाखांपर्यंत ही योजना कर सवलत देते. मुलीचे वय 21 झाल्यानंतर व्याजासह रक्कम दिली जाते.        

7. यूनिट लिंक इन्व्हेस्टमेंट प्लान(Unit Link Investment Plan Scheme): यात इनकम टॅक्स 80 सी च्या अंतर्गत 1.5 लाख रुपये पर्यंत टॅक्स सूट दिली जाते. सोबतच विमा सवलत देखील प्रदान केली जाते. परंतु वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीवर कर भरावा लागतो.       

8. मुदत ठेव योजना (Fixed Deposit): एफडीमध्ये (FD) गुंतवणूक करण्यासाठी इनकम टॅक्स कलम 80 सी अंतर्गत गुंतवणूकदारांना 1.5 लाख रुपये टॅक्स सूट दिली जाते. या स्कीममध्ये मुदत कालावधी हा 5 वर्षे इतका असतो. मुदत ठेव व्याजदरात देखील आर्थिक धोरणानुसार  वेळोवेळी बदल होत असतात हे गुंतवणूकदारांनी लक्षात घेतले पाहिजे.       

9. नाबार्ड बॉन्ड ( NABARD): या गुंतवणुकीत NABARD बॉन्ड खरेदीवर केलेली गुंतवणूक रक्कम देखील 80C च्या अंतर्गत कर वलतीसाठी ग्राह्य धरली जाते.