Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

योग्य मार्गाने कर वाचवा: गुंतवणूक व कर बचत योजनांपासून फायदा मिळवा

योग्य मार्गाने कर वाचवा: गुंतवणूक व कर बचत योजनांपासून फायदा मिळवा

माहिती करून घ्या कर बचत गुंतवणूक (Tax Saving Investment) कशी करावी. सर्वकाळ सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक पर्याय

कोणतीही गुंतवणूक करताना करसवलतीचा विचार करणे फायद्याचे ठरते. त्यादृष्टीने पोस्टातील गुंतवणूक हा पर्याय अधिक उचित ठरणारा आहे. या गुंतवणुकीवर कर सवलतीबरोबरच चांगला परतावा देखील मिळू शकतो. दुसरीकडे आपली गुंतवणूकही सुरक्षित राहू शकते.

यासाठी टपाल खात्याच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate) मध्ये गुंतवणूक करता येईल. पोस्टाच्या बचत योजनेत केवळ चांगला परतावा मिळत नाही, तर इन्कम कलम 80C नुसार कर सवलतही मिळते. या योजनेतील गुंतवणुकीवर मर्यादा नाही. परंतु कमाल दीड लाखांपर्यंत कर सवलतीचा लाभ घेता येतो.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये सध्या वार्षिक 6.8 टक्के व्याज दिले जात आहे. या व्याजदराची आकारणी वार्षिक रुपाने केली जाते आणि ती रक्कम मुदत पूर्ण झाल्यानंतर खातेदाराला दिली जाते. सध्या या योजनेचा कालावधी 5 वर्षे आहे. जर आपण 1 हजार रुपये पाच वर्षासाठी गुंतवले तर पाच वर्षानंतर 1389.49 रुपये मिळतील.

एनएससी (National Saving Certificate)ची वैशिष्टे

  • नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक कधीही करता येते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
  • या योजनेत एक किंवा जास्तीत जास्त तीन व्यक्ती संयुक्तपणे गुंतवणूक करु शकतात. दहा वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलाच्या नावावरही गुंतवणूक करता येते.
  • एनएससीची खरेदी कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून केली जाते.
  • या योजनेत प्रत्येक वर्षी व्याज जमा होते. पण मुदत पूर्ण झाल्याशिवाय ते ग्राहकांना दिले जात नाही. यात टीडीएस (Tax Deducted at Source) कपात नाही.
  • एनएससी गुंतवणूक ही बँका आणि एनबीएफसीकडून कर्जासाठी दुय्यम (Collateral) किंवा हमी म्हणून समजली जाते.
  • गुंतवणूकदार आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला वारसदार करु शकतो.
  • एनएससी घेतल्यानंतर मॅच्युरिटीच्या तारखेपर्यंत गुंतवणूकदार ही योजना दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करु शकतो.